- मयूर पठाडेकाहीच काम नसलं की थंही नेहमीच हवीहवीशी वाटते. अंथरुणात पडून राहावंसं वाटतं. असंही आराम करायला सगळ्यांनाच आवडतं, पण काहीही असलं तरी आपल्या शरीराची किमान हालचाल रोज झालीच पाहिजे. जे हिवाळ्यात होतं, तेच पावसाळ्यातही होतं. हिवाळ्यामुळे आपण घरातून शक्यतो बाहेर पडत नाही आणि पावसाळ्यातली किचकिच, बाहेरची घाण आपल्याला बाहेर पडू देत नाही. पण त्यामुळे आपल्या शरीराचं आपण नुकसानच करून घेत असतो.बाहेरचं वातावरण कसंही असलं तरी आपल्या नेहमीच्या अॅक्टिव्हिटीज आपण सुरूच ठेवल्या पाहिजेत. रनिंग, वॉकिंग, स्विमिंग.. यासारख्या आपल्या नेहमीच्या अॅक्टव्हिटीज बंद पडल्या तरी घरातल्या घरात का होईना, काही व्यायाम, शारीरिक हालचाली आपण केल्याच पाहिजेत. त्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते. आपल्या शरीरातील पेशी कार्यरत राहण्यााठी त्यांचा उपयोग होतो.तज्ञांच्या म्हणण्यानुसार आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही ऋतु, काळ असू द्या, आपली रोजची झोप व्यवस्थित झालीच पाहिजे. रोज किमान सहा ते आठ तास झोप प्रत्येकानं घेतलीच पाहिजे. कारण त्यावरच तुमची एनर्जी, ऊर्जा अवलंबून असते. तुम्हाला जर कायम थकल्यासारखं, निरुत्साही वाटत असेल तर तुमची चयापचय शक्तीही त्यामुळे कमी होते. याच कारणामुळे इन्फेक्शनचा धोकाही मोठ्या प्रमाणावर वाढतो. तुम्ही मद्यपान करीत असाल तर या काळात तुमची तब्येत आणखीच ढासळू शकते. त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या आणि स्वत:ला ठेवा तंदुरुस्त..
रोज तुम्ही किती हालचाल करता?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 3:15 PM
रोजची किमान शारीरिक हालचाल आवश्यकच, नाहीतर चयापचय प्रक्रियेत होइल बिघाड!
ठळक मुद्देबाहेरचं वातावरण कसंही असलं तरी आपल्या नेहमीच्या अॅक्टिव्हिटीज आपण सुरूच ठेवल्या पाहिजेत.बाहेर पडणं शक्य नसेल तर घरातल्या घरात का होईना, काही व्यायाम, शारीरिक हालचाली आपण केल्याच पाहिजेत.त्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते.