जेवण हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळे शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. पण जेवण हे योग्य प्रमाणात, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खावं. त्यात गडबड झाली तर आपण आजारी पडू शकतो. तज्ज्ञांच्या मते आपल्याला जेवढे हेल्दी फूड हवे तेवढेच ते योग्य वेळी खाणंही गरजेचे आहे. अशा परिस्थितीत ब्रेकफास्ट म्हणजेच सकाळचा नाश्ता आणि डिनर म्हणजेच रात्रीच्या जेवणात किती अंतर असावं याबाबत आहारतज्ज्ञांनी आपलं मत मांडलं आहे.
किती अंतर असावं?
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात, कंसल्टेंट डायटीशियन कनिका मल्होत्रा म्हणतात की, रात्रीचे जेवण आणि नाश्ता यामध्ये १२ ते १४ तासांचं अंतर योग्य आहे. म्हणजे सकाळी ७ वाजता नाश्ता केला तर रात्रीचे जेवण ७ ते ९ या वेळेत करा. असं केल्याने तुम्हाला अनेक फायदे होतील.
१२ ते १४ तासांच्या अंतराचे फायदे
मेटाबोलिज्म बूस्ट होतं
कनिका मल्होत्रा यांच्या मते, जास्त अंतर तुमच्या शरीरातील मेटाबॉलिज्मला चालना देईल. यामुळे ग्लुकोजवरील निर्भरता कमी होईल ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होईल. याशिवाय लठ्ठपणावरही नियंत्रण राहील.
हृदयाचं आरोग्य
जर तुम्ही नाश्ता आणि रात्रीच्या जेवणात १३ तासांचे अंतर ठेवले तर हृदयाचे आरोग्यही चांगले राहील. यामुळे तुमचं हृदय मजबूत राहतं आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
पचनक्रिया मजबूत
जास्त अंतर ठेवल्याने पोटात अन्न पचण्यास पुरेसा वेळ मिळेल. यामुळे तुमची पचनशक्ती मजबूत होईल आणि गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास होणार नाही. याशिवाय, यामुळे पोषक तत्वांची उपलब्धताही वाढेल.
झोपेमध्ये सुधारणा
नाश्ता आणि रात्रीचे जेवण यांच्यातील दीर्घ अंतरामुळे रात्री शांत झोप येते. त्यामुळे चांगली झोप मिळते. सकाळी उठल्यानंतर थकवा आणि अशक्तपणा येणार नाही.