Roasted gram benefits : भाजलेले चणे खाणं एक चांगला नाश्ता मानला जातो. कारण यात भरपूर प्रोटीन आणि फायबर असतात. तसेच यात कॅलरी आणि फॅटही कमी असतात. भाजलेले चणे तुम्ही थेट खाऊ शकता किंवा त्यांचा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये समावेश करू शकता. याचे आरोग्याला भरपूर फायदे मिळतात. पण ते लोकांना फार कमी माहीत असतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.हेल्थ एक्सपर्टनुसार, एका निरोगी व्यक्तीने रोज किमान 50 ते 60 ग्रॅम भाजलेले चणे खाणं फायदेशीर ठरतं. यातून शरीराला अनेक खनिज आणि मिनरल्सही मिळतात.
भाजलेले चणे खाण्याचे फायदे
- भाजलेले चणे खाणं शरीरासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर आहे. खासकरून याने हाडे मजबूत होता आणि सोबतच मेटाबॉलिज्मही मजबूत होतं. चण्यांमध्ये आयर्न, कॅल्शिअम, फॉस्फेट, मॅग्नेशिअम, झिंक, मॅगनीज आणि इतरही अनेक पोषक व्हिटॅमिन्स असतात.
- भाजलेल्या चण्यांमध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम भरपूर असतं. जे आपल्या हृदयासाठी खूप फायदेशीर असतात. या पोषक तत्वांमुळे शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. इतकंच नाही तर याने ब्लड प्रेशरही नियंत्रित राहतं. यामुळेच चणे खाणं फायदेशीर ठरतं.
- संधीवात आणि सूज अशा समस्याही भाजलेले चणे खाल्ल्याने दूर होण्यास मदत मिळते. चण्यांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंटही भरपूर असतात जे फुप्फुसं, स्तन आणि पोटाच्या अनेक समस्या दूर करतात.
- रोज मुठभर भाजलेले चणे खाल्ले तर डायबिटीस कंट्रोल करण्यासही मदत मिळते. त्याशिवाय रक्तात शुगर कमी करण्यासही मदत मिळते.