घाम निघणं म्हणजे स्वेटिंग मनुष्याच्या आयुष्यातील सामान्य भाग आहे. घरकाम करताना किंवा मग एक्सरसाइज दरम्यान मनुष्याच्या शरीरातून घाम निघतो. अनेकदा मेडिकल कंडिशनमुळे काही लोकांच्या शरीरातून जास्त घाम निघतो तर काही लोकांना कमी घाम येतो. निसर्गाने प्रत्येक गोष्टीला अर्थ दिला आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, घाम निघणं शरीरासाठी चांगलं कसं असतं? सोबतच एक व्यक्ती वर्षभरात किती घाम गाळतो?
शरीरातून घाम निघणं चांगली बाब आहे. याने शरीराला वेगवेगळे फायदे होतात. सामान्यपणे आपल्याला जाणवतं की, घामाने कपडे भिजलेले आहेत. पण आपल्याला हे माहीत नसतं की, शरीरातून नेमका किती घाम निघाला? याचं उत्तर आता स्कीनकेअर फर्म निवियाने दिलं. त्यांनी जे उत्तर दिलं ते वाचून तुम्ही हैराण व्हाल. आपल्या नव्या रिसर्चमध्ये निवियाने सांगितलं की, एका सामान्य व्यक्तीच्या शरीरातून वर्षभरात २७८ गॅलन म्हणजे बाराशे ६४ लीटर घाम जातो.
स्कीनकेअर कंपनीने सांगितलं की, जर १५ ते ८२ लोकांचा घाम एका जागी जमा केला तर याने छोटा तलावही तयार होईल. इतक्या घामात लंडनचं एक्वेरिअम भरेल. घामाचं हे प्रमाण नॉर्मल लाइफमध्ये आहे. जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल किंवा अंग मेहनतीचं काम करत असाल तर घामाचं प्रमाण अधिक वाढतं.
जेव्हा मनुष्य फिजिकल अॅक्टिविटी करत असतो तेव्हा एका तासात त्यांच्या शरीरातून अर्धा ते दोन लीटर घाम जातो. तेच ज्यांना खूप जास्त घाम येतो ते साधारण तीन लीटर घाम गाळतात. या रिपोर्टमध्ये घामाबाबतचे अनेक फॅक्ट्स समोर आले आहेत. यात सांगण्यात आलं आहे की, तसे तर महिलांमध्ये घामाचे ग्लॅंड जास्त असतात, पण पुरूषांना त्यांच्यापेक्षा जास्त घाम येतो. त्यासोबतच वातावरण आणि लठ्ठपणा यावरही घाम येणं अवलंबून असतं.