जे लोक एक्सरसाइज करतात ते दोनच कारणांनी एक्सरसाइज करतात एकतर ते फिटनेसबाबत जागरूक असतात दुसरं म्हणजे त्यांना वजन कमी करायचं असतं. वजन कमी करायचं असेल तर एक्सरसाइजशिवाय पर्याय नाही हेही तेवढंच खरं. पण तासंतास एक्सरसाइज किंवा कमी एक्सरसाइज याचं यात काही महत्व नाही. वजन कमी करण्यासाठी योग्य डाएटसोबत योग्य एक्सरसाइजही महत्वाची आहे. पण जोपर्यंत तुम्ही एक्सरसाइज करण्याचा टाइमटेबल ठरवत नाही तोपर्यंत तुम्ही तुम्हाला हवं तसं वजन कमी करू शकणार नाहीत.
(Image Credit : shape.com)
अनेकजण वजन कमी करण्याच्या नादात फार जास्त वेळ एक्सरसाइज करतात. पण मुळात हा विचार चुकीचा आहे. तर फार कमी एक्सरसाइज करूनही तुमचा केवळ वेळ वाया जात असतो. तसेच फार जास्त एक्सरसाइज केल्याने तुमच्या मांसपेशी तणावग्रस्त होतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी एका वयस्क व्यक्तीने सरासरी किती एक्सरसाइज करावी हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
एक्सरसाइजसाठी योग्य आणि आदर्श वेळ
(Image Credit : mensjournal.com)
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर याचा अर्थ हा नाही की, तुम्ही शरीराला नुकसान पोहोचवून वजन कमी करावं. अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनच्या एका रिसर्चनुसार, वजन कमी करण्यासाठी योग्य एक्सरसाइजची वेळ म्हणजे तुम्ही दर आठवड्याला १५० ते २५० मिनिटांची हाय इंटेसिटी ट्रेनिंग आणि मध्यम एक्सरसाइज करावी.
रोज वर्कआउट रूटीन
(Image Credit : health.clevelandclinic.org)
वजन कमी करण्यासाठी तुम्ही दररोज एक रूटीन तयार केलं पाहिजे. ज्यात हाय इंटेसिटी ट्रेनिंग आणि मध्यम एक्सरसाइज दोन्ही असतील. रोज तुम्ही २५ ते ३५ मिनिटे एक्सरसाइज करा. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल.
मात्र, जर कुणी त्यांच्या शरीरातील कॅलरी कमी प्रमाणात बर्न करत असतील तर त्यांना सुद्धा दर आठवड्यात १५० ते २५० मिनिटांची एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. याने तुम्ही अधिक वेगाने कॅलरी बर्न करून वजन कमी करू शकता.
वजन कमी करणाऱ्या एक्सरसाइज आणि त्यांचा वेळ
असं अजिबात गरजेचं नाही की, तुम्ही वजन कमी करण्यासाठी जिममध्येचं जावं. तुम्ही घरीही काही एक्सरसाइजच्या मदतीने वजन कमी करू शकता. ज्यात सायकलिंग, धावणे, स्वीमिंग यांसारख्या इतरही एक्सरसाइज करू शकता. आम्ही तुम्हाला काही एक्सरसाइज आणि त्या किती वेळासाठी कराव्या हे सांगणार आहोत. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल.
१) रनिंग - दररोज २० ते ४० मिनिटांसाठी
२) ब्रिस्क वॉकिंग - दररोज १ तास
(Image Credit : businessinsider.in)
३) स्वीमिंग - दररोज ४० मिनिटे
४) एरोबिक - दररोज १ तास
वजन कमी करण्यासाठी काही खास टिप्स
- जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर नेहमीच पुरेशी झोप घ्यावी आणि तणावाला दूर ठेवावे.
- तसेच तुम्ही प्रोटीन आणि हाय फायबरने भरपूर खाद्य पदार्थांचं सेवन करावं.
- फास्ट फूड, जंक फूड आणि प्रोसेस्ड फूडचं सेवन बंद करावं.
- दररोज वेळेवर जेवण करा, भरपूर पाणी प्या आणि शारीरिक सक्रियता वाढवा.