(Image Credit : healthymummy.com)
वजन कमी करण्यासाठी लोक हेल्दी डाएट प्लॅन फॉलो करतात. पण त्या पदार्थांना चव नसते. मग लोक काही दिवसांनी हे पदार्थ खाऊन कंटाळतात आणि पुन्हा आपल्या आवडीचे पदार्थ खाऊ लागतात. अशात प्रश्न असा उभा राहतो की, एक दिवस ओव्हरइटिंग केल्याने किती वजन वाढू शकतं. काही लोकांना चिंता होऊ लागते की, त्यांच्या वजन कमी करण्याच्या अनेक दिवसांच्या मेहनतीवर पाणी फेरलं गेलं. पण खरंच असं होतं का?
एक दिवस ओव्हरइटिंगने वजनावर किती प्रभाव पडतो?
तुम्ही एक दिवस ओव्हरइटिंग केलं तरी त्याने फार जास्त फरक पडत नाही. कारण वजन कमी करण्याच्या तुलनेत वजन वाढवणं इतकं सोपं नसतं. त्यामुळे तुम्हाला कॅलरी काऊंटवर लक्ष दिलं पाहिजे. कसं ते समजून घेऊ.
वेट लॉसवर कॅलरी डाएटचा प्रभाव
(Image Credit : shape.com)
हेल्थ एक्सपर्ट आणि डाएट एक्सपर्ट सांगतात की, शरीरातील एक किलो वजन कमी करण्यासाठी साधारण ७७०० कॅलरी बर्न करण्याची गरज असते. त्याचप्रमाणे जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर अतिरिक्त कॅलरी डाएट घ्यावी लागते. इथे अतिरिक्त कॅलरीचा अर्थ तुम्ही तुमच्या शरीराच्या गरजेच्या व्यतिरिक्त ७७०० कॅलरी अधिक घ्याल, तेव्हा कुठे तुमचं १ किलो वजन वाढेल. या हिशोबाने बघितलं तर तुम्ही इतकं अन्न खाऊच शकत नाही.
यावरून हे तर नक्की स्पष्ट आहे की, जर तुम्ही आठवड्यातून एक दिवस अधिक कॅलरी असलेला आहार घेतही असाल तरी तुमच्या वजनावर फार काही फरक पडणार नाही. पण जर तुम्ही डाएट प्लॅन बदलला, तर या परिणाम उलट होऊ शकतो.
एका दिवसात ओव्हरइटिंगही गरजेचं
(Image Credit : healthywomen.org)
चीट डे डाएटबाबत तुम्हाला ऐकलं असेलच. यात आठवड्यातून एक दिवस तुम्ही काहीही खाऊ शकता. याचा अर्थ असा होतो की, जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी एखादा डाएट प्लॅन फॉलो करतही असाल, तरी एक दिवस जास्त कॅलरी किंवा तुमच्या आवडीचं काहीही खाऊ शकता.
(Image Credit : thesun.co.uk)
डाएट एक्सपर्ट मानतात की, एक दिवस जास्त खाल्ल्याने वजनावर काहीही प्रभाव पडत नाही. पण एक दिवस अधिक खाल्ल्याने पोट भरलेलं आणि संतुष्ट राहू शकतं. फिटनेस एक्सपर्टही असाच सल्ला देतात की, वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन फॉलो करणारे लोक आठवड्यातून एक दिवस काहीही खाऊ शकतात. पण दुसऱ्या दिवसांपासून त्यांनी त्यांची डाएट फॉलो करावी. त्यासोबतच डाएट आणि फिटनेस एक्सपर्ट सांगतात की, नियमित एक्सरसाइज आणि वर्कआउट अजिबात बंद करू नये.