शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
शरद पवार गटाचे उमेदवार समजीत घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
3
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
4
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
5
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
6
'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
7
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल
8
८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक
9
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?
10
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
11
नेत्रदिपक भरारी! मेडिकलचं करिअर सोडलं, काहीतरी मोठं करायचं ठरवलं; झाली अधिकारी
12
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
13
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
14
अमिषा पटेलनं का नाकारला होता शाहरुख खानचा 'चलते चलते'?, अभिनेत्री म्हणाली - "मला..."
15
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
16
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
17
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
18
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
19
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
20
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर

केसगळती थांबवण्यासाठी कोणत्या तेलाने करावी मालिश?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2022 11:04 AM

तेलाने मालिश करणे हा उपाय अनेक वर्षांपासून केला जातो. त्यात जर मोहरीच्या तेलाने मालिश केली तर फायदा अधिक होतो. 

केसगळती रोखण्यासाठी आणि केसांची सुंदरता वाढवण्यासाठी महिला असो वा पुरूष नेहमीच वेगवेगळे उपाय करत असतात. त्यासाठी भरमसाठ पैसाही खर्च केला जातो. इतकेच नाही तर हेअर स्पा आणि मसाज थेरपी सुद्धा करतात. पण तेलाने मालिश करणे हा उपाय अनेक वर्षांपासून केला जातो. त्यात जर मोहरीच्या तेलाने मालिश केली तर फायदा अधिक होतो. 

मोहरीचं तेल केसांसाठी फार फायदेशीर मानलं जातं. याने केसगळती थांबते सोबतच केसांची वाढ होण्यासही मदत होते. पण अनेकांना केसांना मोहरीचं तेल लावण्याची योग्य पद्धतच माहीत नसते. आम्ही ही पद्धत सांगणार आहोत.

१) अनेकजण सांगतात की, मोहरीच्या तेलाने रोज केसांची मालिश करावी. पण असं नाहीये. आठवड्यातून दोन दिवसही मोहरीच्या तेलाने मालिश केली तरी फायदा होतो. मोहरीचं तेल लावण्याआधी त्यात दोन ते तीन लसणाच्या कळ्या टाकून तेल गरम करावे.

२) तेल थंड झालं की, त्यात लिंबू मिश्रित करा आणि केसांच्या मुळात चांगल्याप्रकारे लावा. लांब केसांना बोटांच्या मदतीने हळूहळू तेल लावा. यावेळी नखे वाढलेले नसावेत नाही तर डोक्याच्या त्वचेला इजा होण्याची इजा होण्याची शक्यता असते. 

३) मोहरीचं केल अनेक वर्षांपासून मसाज करण्यासाठी वापरलं जातं. आयुर्वेदानुसार, मोहरीच्या तेलाचा वापर केसगळती थांबवण्यासाठी केला जातो. मोहरीच्या तेलामध्ये हीना मेहंदीची पाने शिजवून हे मिश्रण लावल्याने केस मजबूत होतात. 

४) केसांना तेल लावल्यावर कमीत कमी ३ ते ४ तास तसेच राहू द्या. त्यानंतर शॅम्पूने केस चांगले धुवा. आठवड्यातून कमीत कमी २ वेळा ही प्रक्रिया रिपिट करा. काही दिवसातच याचा फायदा तुम्हाला बघायला मिळेल. 

५) मोहरीच्या तेलाने केसातील कोंडाही दूर होतो आणि केसगळती थांबते. यात बीटा कॅरोटीन, फॅटी अ‍ॅसिड, आयर्न, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम आढळतात. याने केसांची वाढ होण्यास मदत होते. 

६) मोहरीच्या तेलामध्ये अ‍ॅंटी-मायक्रोबियल गुण आढळतात. याने डोक्याच्या त्वचेला पोषण मिळत आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो. तसेच केस लांब होण्यासही याने मदत होते.

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स