Poor sleep : बरेच नेहमीच तक्रार करत असतात की, त्यांची झोपच झाली नाही किंवा त्यांना रात्री चांगली झोपच लागली नाही. याची कारणे वेगवेगळी असतात. पण एकदा अशी तक्रार करून लोक या विषयाकडे दुर्लक्ष करतात. पण असं करणं तुम्हाला खूप महागात पडू शकतं. कारण कमी झोप किंवा चांगली झोप झाली नसेल तर याचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो.
एक्सपर्ट सांगतात की, कोणत्याही वयातील व्यक्तीने चांगली झोप घेतली पाहिजे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये चार स्लीपिंग पॅटर्न शोधण्यात आले आहेत आणि सांगण्यात आलं आहे की, ते कसे कोणत्याही व्यक्तीच्या झोपेला प्रभावित करतात. सायकोसोमॅटिक मेडिसिनमध्ये गेल्या महिन्यात प्रकाशित झालेल्या रिसर्चनुसार, डिमेंशिया असलेल्या लोकांमध्ये जुने आजार विकसित होण्याची शक्यता खूप जास्त असते.
पेन स्टेट यूनिवर्सिटीच्या रिसर्चर्सने 3700 लोकांच्या डेटाचं विश्लेषण केलं ज्यात 10 वर्षाच्या अंतराने दोनदा त्यांची झोपण्याची सवय आणि आरोग्याची स्थिती याचा अभ्यास केला. यात त्यांना चार वेगवेगळे झोपेचे पॅटर्न आढळून आले. ज्याच चांगली झोप घेणारे, वीकेंडला चांगली झोप घेणारे, झोपेची समस्या असलेले आणि काही वेळ झोपणारे यांचा समावेश होता.
सीडीसीनुसार, वयस्कांनी रात्री कमीत कमी सात तासांची चांगली झोप घेतली पाहिजे. पण असं वाटतं की, बरेच लोक इतकी झोप घेऊ शकत नाहीत. रिसर्चमध्ये सहभागी अर्ध्या पेक्षा अधिक लोकांना झोपेची कमी किंवा झोप पूर्ण न होण्याची समस्या आणि काही वेळ झोपणारे अधिक होते. ही गंभीर बाब आहे. ज्यांना 10 वर्षापासून ही समस्या होती त्यांना हृदयरोग, डायबिटीस, डिप्रेशन आणि शारीरिक कमजोरी या समस्या होत्या. जे लोक दिवसातून दोन ते तीन वेळा काही वेळासाठी झोपतात त्यांना डायबिटीस, कॅन्सर आणि कमजोरीचा धोका वाढला होता.
अभ्यासकांनी सांगितलं की, कमी शिकलेले आणि बेरोजगार लोकांमध्ये झोप न येण्याची समस्या अधिक होती. रिसर्चचे मुख्य सूमी ली यांनी सांगितलं की, 'हे रिझल्ट सांगतात की, आपल्या झोपेची सवय बदलणं फार अवघड आहे. कारण स्लीपिंग हेल्थ बरोबर असणं हे ओव्हरऑल लाइफस्टाईलवर अवलंबून असतं. यातून हेही समजतं की, लोकांना अजूनही त्यांच्या झोपेचं महत्व आणि कमी झोप घेतल्याने होणाऱ्या नुकसानाबाबत माहीत नाही'.