सध्याच्या काळात लोक कामात इतके व्यस्त असतात कि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची ठरवलं तर ते शक्य होत नाही. आपल्यापैकी फार कमी लोक असे आहेत जे रोज ठरवलेल्या वेळेत झोपतात. सर्वाधिक लोकांची खाण्यापिण्याची वेळ आणि झोपण्याची निश्चित नसते. त्यामुळे आजारांचा सामना करावा लागतो. त्यातल्यात्यात सगळ्यात जास्त जाणवणारी समस्या म्हणज गॅस आणि अॅसिटिडी होण्याची दिसून येते.
अनेक लोकं आपल्या आरोग्याला सांभाळण्यासाठी आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी काही पदार्थांचे सेवन करणं पुर्णपणे बंद करतात. जसं की काही लोकं अॅसिटीडी होईल म्हणून तिखट, तेलकट आणि आंबट पदार्थ खात नाहीत. तसंच गॅस होईल म्हणून अनेकजण बाहेरचे बटाटा असणारे पदार्थ खाणं टाळतता. पण तुम्हाला माहीत आहे का अनेकदा एवढं करून सुद्धा आरोग्यासंबंधी तक्रारी उद्भवत असतात. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही अॅसिडिटी आणि गॅसच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता.
पोट साफ होण्यासाठी लिंबू फायदेशीर ठरत असतो. लिंबाचं सेवन केल्याने खालेल्या अन्नाचं पचन चांगल्या पद्धतीने होते. जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिण्याची सवय असेल तर गरम पाण्यात लिंबू घालून या पाण्याचे सेवन करा. त्यामुळे तुमचं पोट साफ राहील आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होईल.
पालक
पालक हे खूप फायदेशीर पदार्थांपैकी एक आहे. पालेभाज्या खाल्लामुळे ज्यांना पोटाशी संबंधीत समस्या असतात. त्या दूर होतात. आहारात पालकाचा समावेश असल्यास आतड्यांच्या कोणत्याही प्रकारचे घटक साठून राहता पोट साफ होते त्यामुळे आहारात पालकाचा समावेश केल्यास गॅस होण्याची समस्या उद्भवत नाहीत.
जिऱ्याचं पाणी
पाणी गरम करुन त्यात साधारण एक चमचा जिरे घाला. जिऱ्याचा अर्क संपूर्णपणे पाण्यात उतरल्यानंतर ते पाणी थंड करुन त्या पाण्याचे सेवन करा. अॅसडिटीमुळे तुमच्या छातीत आणि पोटात जळजळ होत असेल किंवा तुम्हाला गॅस झाल्यासारखे वाटत असतील तर तुम्ही जिऱ्याचे पाणी अगदी हमखास प्या.
नारळ पाणी
अॅसिडिटीमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही नारळाचे पाणी प्या. तुमच्या पोटातील आग शमवण्याची क्षमता त्याच्यामध्ये जास्त असते. साधारण एका नारळाचे पाणी तुम्ही पूर्ण प्या. हे पाणी शरीराला थंडावा मिळण्यासाठी गुणकारक ठरतं असतं. त्यामुळे अॅसिटिडीचा त्रास होत असल्यास नारळाचं पाणी प्यायल्याने फरक जाणवेल.
तुळशीची पानं
तुळशीच्या पानांमध्ये सुदींग आणि कार्मीनेटीव्ह म्हणजेच पोटाला आराम वाटेल असे गुणधर्म असतात. त्यामुळे अॅसिडिटीचा त्रास काही वेळात कमी होतो. तुम्हाला पोटात जळजळ जाणवत असेल तर लगेच तुळशीची पाने चावून खा किंवा ३-४ पाने कपभर पाण्यात उकळून त्याचा काढा करून प्या. तुळशीच्या पानांचा असा वापर करून तुम्ही पोटाच्या तक्रारी कोणतंही औषध न घेता दूर करू शकता.