दिवसेंदिवस उन्हाळा जास्त वाढत चालला आहे. त्यामुळे गरमीचं वातावरण सर्वत्र आहे. वाढत्या गरमीच्या वातावरणात सगळ्यात जास्त घाम काखेत येतो. घामामुळे त्वचेवर मॉईश्चर आलेलं असतं. त्यामुळे बॅक्टेरियांची वाढ त्वचेवर सहज होऊ शकते. परिणामी स्किन इन्फेक्शनचा सामना करावा लागू शकतो. घामामुळे त्वचेवर इन्फेक्शन झाल्यास बारिक बारिक दाणे दिसायला सुरूवात होते, जळजळ होते. जेव्हा या बारीक पुळ्यांवर तुमच्या कपड्यांचे घर्षण होतं त्यावेळी खूप आग होते. या स्किन इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी काय करायला हवं याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
खाजवल्यानंतर इन्फेक्शन वाढतं
स्किन इन्फेक्शनमुळे होणारी जळजळ दूर करण्यासाठी तुम्ही जर खाजवत असाल तर ते जास्त पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाजवण्याची चूक करू नका. शरीराच्या एका भागावरून इतर भागांना स्पर्श केल्यास इन्फेक्शन पसरत जातं.
उन्हाळ्यात घाम सगळ्यांनाच येतो. पण जे लोक आपल्या अंडरआर्म्सच्या त्वचेची चांगली स्वच्छता करत नाहीत अशा लोकांना इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. म्हणून बॅक्टेरियाचं इन्फेक्शन वाढत जाण्याची शक्यता असते. त्यासाठी रोज दोनवेळा अंघोळ करणं गरजेचं आहे. अंघोळ करत असताना अंडर आर्म्सची चांगली स्वच्छता करा. ( हे पण वाचा-फक्त बीपी, वेट लॉस नाही; तर अनेक गंभीर समस्यांवर फायदेशीर ठरतं कलिंगड खाणं)
अंडरआर्म्स स्किन इंफेक्शनपासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी
अंडरआर्म्स स्वच्छ आणि कोरडे ठेवा. अंघोळ झाल्यानंतर टॉवेलने नीट पुसून घ्या.
उन्हातून चालत असताना सूती कपडे घालण्याचा प्रयत्न करा.
जास्त गरमी असलेल्या ठिकाणी जास्तवेळ थांबू नका.
जर इन्फेक्शन झालं असेल तर एंटी बॅक्टेरिअल साबणाचा वापर करा.
फंगल इन्फेक्शन किंवा कोणत्याही प्रकारचं स्किन इन्फेक्शन लवकर बंर होणारं नसतं. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन क्रिम, गोळ्या एंटीबायोटीक्स घ्या.
एंटी बॅक्टेरिअल क्रिममुळे त्वचेवरील खाज दूर होण्यास मदत होते.
जास्तीत जास्त पाणी प्या, हिरव्या भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा. ( हे पण वाचा-हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी दिसतात 'ही' लक्षणं, दुर्लक्ष करणं ठरू शकतं जीवघेणं)