शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
3
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
4
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
5
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
6
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
7
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
8
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
9
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
10
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
11
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
12
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
13
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
14
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
15
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
16
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
17
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
18
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
19
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
20
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का

लाल कांद्याने 'या' गंभीर आजाराचा होईल नायनाट, जाणून घ्या कसा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 9:47 AM

Red Onion : अस्थमा एक अशी स्थिती आहे ज्यात व्यक्तीची श्वासनलिका आकुंचते आणि त्यावर सूज येते. अस्थमामुळे व्यक्तीला श्वास घेण्यास समस्या होते आणि त्यांना खोकला, अस्वस्थ आणि श्वास भरून येण्याची समस्या होते.

Red Onion : कांदा हा आपल्या आहारातील महत्वाचा भाग आहे. कांद्याशिवाय कोणतीही भाजी चांगली लागत नाही. कधी लाल तर कधी पांढरा कांदा वापरला जातो. पण यांचे फायदेही वेगवेगळे असतात. लाल कांदा एका गंभीर आजाराला दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतो.

अस्थमा एक अशी स्थिती आहे ज्यात व्यक्तीची श्वासनलिका आकुंचते आणि त्यावर सूज येते. अस्थमामुळे व्यक्तीला श्वास घेण्यास समस्या होते आणि त्यांना खोकला, अस्वस्थ आणि श्वास भरून येण्याची समस्या होते. पण हा अस्थमा आहाराच्या  मदतीने नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. अनेकजण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात की, अस्थमामध्ये काय खावे आणि काय खाऊ नये.

आज आम्ही तुम्हाला लाल कांद्याचा यात फायदा कसा होतो हे सांगणार आहोत. सामान्यपणे वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी कांद्याचा वापर केला जातो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, कांद्यात अनेक आजारांसोबत लढण्याची क्षमताही असते. अस्थमात लाल कांदा फार फायदेशीऱ ठरतो. चला जाणून घेऊ याचे फायदे...

लाल कांद्याचे फायदे

लाल कांद्यात भरपूर प्रमाणात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स तत्व असतात. त्यात फ्लेवेनॉएड्स आणि एंथोसियानिंस हेही तत्व असतात. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, लाल कांद्यात जवळपास २५ प्रकारचे  एंथोसियानिंस तत्व असतात. फ्लेवेनॉएड्सने युक्त असल्याने यात रक्ताला नैसर्गिक रूपाने पातळ करण्याचा गुण असतो. लाल कांद्यात फायटोकेमिकल्स सुद्धा असतं ज्याने इम्यून सिस्टीम मजबूत होतं.

लाल कांद्यात व्हिटॅमिन के, बी६ आणि सी भरपूर प्रमाणात असतं. तसेच यात फायबरचं प्रमाणही अधिक असतं. ज्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते. त्यासोबतच यात खनिज पदार्थ, फोलेट, थियामिन, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि मॅगनीज असतात. 

अस्थमात लाल कांदा

अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, लाल कांद्यातील अनेक तत्वांमुळे जसे की, थिओसल्फेट, क्यूसरसेटिन आणि एंथोसियानिन सियानिडिन असतं. हे तत्व अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटच्या रूपात असत आणि यानेच लाल कांदा अस्थमावर फायदेशीर ठरतो.

कांदा वापरण्याची योग्य पद्धत

सर्वातआधी तर एका भांड्यात ब्राउन शुगर घ्या आणि ती विरघळवा. त्यात लाल कांदा कापून ठेवा. जेव्हा शुगर पूर्ण विरघळेल तेव्हा त्यात कांदा कापून टाका. आता या मिश्रणात पाणी टाका आणि उकडून घ्या. आता हे मिश्रण थंड होऊ द्या आणि त्यात नंतर लिंबू व मध टाका. हे मिश्रण एका भांड्यात काढून ठेवा.

कसे कराल सेवन

जर तुम्हाला अस्थमा असेल तर आणि त्यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर लाल कांद्याचं हे मिश्रण रोज जेवणाआधी एक चमचा सेवन करावं. तुम्ही जेवणातही लाल कांद्याचा वापर करू शकता. जर तुम्हाला अस्थमाची समस्या असेल तर लाल कांद्याचा हा उपाय तुम्हाला मदत करू शकतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य