सगळ्या महिला या महिन्याच्या चार ते पाच दिवसात मासिकपाळीच्या वेदनेने हैराण झालेल्या असतात. मासिक पाळी आल्यानंतर पोट, पाठ, कंबर दुखायला सुरूवात होते. काही महिलांना वेदना इतक्या असह्य होतात की त्यामुळे त्यांना घराबाहेर पडणं सुद्धा कठिण होऊन बसतं. पोटात गोळा येणे, पाठ दुखणे यांसारख्या समस्या उद्भवतात. यावर उपाय म्हणून जर तुम्ही पेनकिलर घेतली तर तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम घडू शकतो.
त्यामुळे रक्तस्त्राव कमी होण्याची सुद्धा शक्यता असते. जर तुम्हाला सुद्धा मासिक पाळीच्या त्रासाचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही काहीही न करता फक्त चहाचं सेवन करून मासिकपाळी दरम्यान होत असलेल्य वेदना कमी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कसं करायचं चहाचं सेवन.नेहमी प्रत्येक मुलीला पाळी येणं म्हणजे संकट आल्यासारख वाटतं असतं.
कारण त्या काळात शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. तसंच मुडस्विंग्व चेंन्ज होत असतात. चिडचिड आणि अंगदुखी सुध्दा जाणवत असते. जर तुम्हाला तुमचं आरोग्य मासिक पाळीच्या दिवसात सुद्धा व्यवस्थीत ठेवायचं असेल तर तुम्ही योग्य आहार घेणं गरजेचं आहे.
मासिक पाळीच्यावेळी अंगदुखीचा त्रास जास्त होत असल्यालस अनेक मुली आणि महिला पेनकिलरचा वापर करतात. पण गोळ्यांचे साईडईफेक्टस सुध्दा होण्याची शक्यता असते. अशात गोळ्या घेण्यापेक्षा घरगुती उपाय वापरल्यास फायदेशीर ठरेल. मासिक पाळीच्या वेदना दूर करण्यासाठी सगळ्यात फायदेशीर असतं ते म्हणजे एक कप गरम चहा.
चहाच्या गरमीमुळे शरीराच्या मासपेशींना आराम मिळतो. त्यामुळे मासिकपाळीच्या वेदना कमी करण्यासाठी गरम पाण्याची पिशवी आणि हिटिंगपॅड वापरण्याचा सल्ला दिला जातो. गरम चहा पिल्याने रिलॅक्स वाटतं. त्यामुळे तुम्ही दैनंदिन कामं व्यवस्थित करू शकता.
शरीरातील उर्जा मिळण्यासाठी चहा फायदेशीर ठरतो. मासिक पाळीच्या वेळी तुम्हाला खुप थकल्यासारख वाटतं असतं. त्यावेळी जर तुम्ही चहाचं सेवन केलंत तर तुम्हाला उर्जा मिळेल. आणि ताजेतवाने झाल्यासारखं वाटतं. पाठ आणि कंबर दुखण्यापासून आराम मिळतो.