आता उन्हाळा सुरू झाला आहे. सध्या लॉकडाऊनमुळे अनेक लोक आपापल्या घरी असले तरी काही दिवसांनी घराबाहेर पडल्यानंतर उष्णतेचा त्रास जाणवतो. अशात शरीरात पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे वेगवेगळ्या समस्यांना समोरं जाव लागतं त्यात महिलांना उद्भवत असलेल्या आणि पुरूषांना उद्भवत असलेल्या समस्या वेगळ्या असल्यातरी खाज येण्याची आणि फंगल इन्फेक्शनची समस्या कॉमन जाणवणारी असते. खाज किंवा शरीरावरचं फंगल इन्फेक्शन दूर करण्यासाठी औषधांमध्ये आणि पावडरमध्ये खूप खर्च होतो. आज आम्ही तुम्हाला झेंडूच्या फुलाचा वापर करून कशी खाज दूर पळवू शकता. याबाबत सांगणार आहोत.
कधी कधी शरीरावर गोल रिंग लालसर रंगाच्या तयार होतात आणि खाज यायल सुरूवात होते. पण बाजारात अनेक क्रिम्स असतात. ज्या फंगल इन्फेक्शनचा तात्पुरता नाहिसं करतात. त्यामुळे पुन्हा पुन्हा ही समस्या उद्भवते. कारण समस्या नष्ट होण्याऐवजी काही वेळासाठी क्रिममुळे दाबली जाते आणि पुन्हा त्वचेवर चट्टे येतात. झेंडूचं फुल फक्त पुजेसाठी वापरलं जातं असं नाही. यात अनेक एंटी- फंगल एंटी एलर्जीक गुण असतात. ( हे पण वाचा - CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये फ्रिजमध्ये 'या' ९ गोष्टी असायलाच हव्यात..)
असा करा वापर
सगळ्यात आधी झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या करून घ्या. या पाकळ्या उकळत्या पाण्यात घाला. हे पाणी काही वेळ गरम झाल्यानंतर गॅस बंद करा. हे पाणी थंड झाल्यानंतर शरीराच्या ज्या ठिकाणी तुम्हाला खाज येत आहे. अशा ठिकाणी लावा. नंतर तो भाग धुवून टाका. याशिवाय दुसरी पध्दत म्हणजे झेंडूच्या फुलांची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट इन्फेक्शन झालेल्या भागांना लावा. त्यामुळे तुमच्या शरीरावरील खाज चट्टे निघून जाण्यास मदत होईल. ( हे पण वाचा- 21 दिवसांच्या 'लॉकडाऊन'दरम्यान आपलं वजन 'अप' होऊ नये यासाठी...)