(Image Credit: Diolli.com)
वजन कमी करण्यासाठी लोक काय काय करत असतात. पण योग्य पद्धती फॉलो न केल्यास वजन कमी करणे कठीण आहे. वजन कमी करण्यात डाएटसोबतच तुम्ही खात असलेलं अन्न कशाप्रकारे शिजवता हेही महत्वाचं आहे. चला जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी अन्न शिजवण्याची योग्य पद्धत.....
स्टीमिंग म्हणजेच वाफेवर शिजवा
पदार्थ वाफेवर शिजवल्याने त्यातील पोषक तत्वे सुरक्षित राहतात. भाज्या, तांदूळ आणि डाळ या गोष्टी कमी पाण्यात वाफेवर शिजवा. भाज्या प्रेशर कुकरच्या वाफेवर शिजवणे कधीही चांगले. यात तेल टाकण्याचीही गरज नसते. भाजी अशाप्रकारे शिजवल्यास भाज्यांचा रंग आणि पोषक तत्वे कायम राहतात. याने तुमचं वजन कमी करण्यास मदत होईल.
शिजवणे का गरजेचे आहे ?
जनरली आपण अन्न कितीही काळजीपूर्वक शिजवलं तरीही त्यातील 10 ते 15 टक्के पोषक तत्वे नष्ट होतात. पण वेगवेगळे पदार्थ शिजवून खाण्याचे अनेक फायदेही आहेत. यामुळे पचनक्रिया सुधारते. तर काही खाद्य पदार्थ हे शिजवल्याशिवाय आपण खाऊच शकत नाही.
जेवण बनवण्याची योग्य पद्धत
आपण काय खातो याहीपेक्षा आपण ते कसं तयार करतो आणि कसं शिजवतो हे महत्वाचं आहे. खाद्य पदार्थ दोन प्रकारे खाल्ले जातात. एक म्हणजे कच्चे आणि दुसरा म्हणजे शिजवून. अनेक भाज्या आणि फळे कच्चे खाणेच फायद्याचे असते. पण प्रत्येक गोष्ट कच्ची खाऊ शकत नाही. जेवण स्वादिष्ट करण्यासाठी आपण त्यात वेगवेगळे मसाले टाकून त्या भाजीतील पोषक तत्वे नष्ट करतो.
पोषक तत्वे सुरक्षित राहतात
वाफेवर शिजवण्यात आलेल्या पदार्थांमध्ये पौष्टिकता अधिक प्रमाणात असते. पण ते शिजवल्याने त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. पण वाफेवर भाज्या-पदार्थ शिजवल्यास त्यातील पोषक तत्वे कायम राहतात. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.