शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

गोड खाल्ल्याशिवाय राहवत नाही? जाणून घ्या Sugar Craving रोखण्याचे सोपे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2022 6:02 PM

समजा एखादी व्यक्ती दररोज २००० कॅलरीज घेत असेल, तर त्या व्यक्तीच्या शरीरात दिवसभरात सर्व स्रोतांतून १२ चमच्यांपेक्षा जास्त साखर जाणं त्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी धोकादायक (Simple Ways To Stop Sugar Craving) ठरू शकतं.

प्रत्येक शुभकार्यात, तसंच प्रत्येक चांगल्या प्रसंगी गोड खाण्याची आणि भरवण्याची पद्धत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया, केक, चॉकलेट्स, कुकीज वगैरे अगदी प्रत्येक घरात कायमच उपलब्ध असतात, असं म्हणायला हरकत नाही. हे गोड पदार्थ पाहिल्यानंतर बहुतांश जणांच्या तोंडाला पाणी सुटतं. अनेकांच्या बाबतीत तर अशी परिस्थिती असते, की ज्यांना गोड (Sweets) खाल्ल्याशिवाय राहवतच नाही. दर काही तासांनी ते गोड खाण्यासाठी काही ना काही पर्याय शोधत असतात.

त्यामुळे साहजिकच त्यांच्या शरीरात गोड पदार्थ आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात जातात. गोड पदार्थ पाहून तोंडाला पाणी सुटण्याच्या या प्रक्रियेला शुगर क्रॅव्हिंग असं म्हटलं जातं. 'हेल्थलाइन'च्या म्हणण्यानुसार, शुगर क्रॅव्हिंग (Sugar Craving) ही अगदी सहज पाहायला मिळणारी समस्या आहे आणि ती जास्तकरून महिलांमध्ये पाहायला मिळते. एका अभ्यासातून असं लक्षात आलं आहे, की ६८ टक्के पुरुष आणि ९७ टक्के महिलांमध्ये शुगर क्रॅव्हिंगची समस्या आढळते.

'डाएटरी गाइडलाइन ऑफ अमेरिकन्स'च्या शिफारशीनुसार, आपल्या रोजच्या कॅलरी इनटेकमध्ये म्हणजेच जास्तीत जास्त १० टक्के भागच शुगरचा असला पाहिजे. याचाच अर्थ असा, की आपण रोज जेवढ्या कॅलरीज आहाराच्या रूपाने शरीरात घेतो, त्यापैकी केवळ १० टक्के कॅलरीज साखरेच्या रूपात असल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, समजा एखादी व्यक्ती दररोज २००० कॅलरीज घेत असेल, तर त्या व्यक्तीच्या शरीरात दिवसभरात सर्व स्रोतांतून १२ चमच्यांपेक्षा जास्त साखर जाणं त्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी धोकादायक (Simple Ways To Stop Sugar Craving) ठरू शकतं.

शुगर क्रॅव्हिंगमुळे (Sugar Craving) काय नुकसान होऊ शकतं?

-शरीरात डिहायड्रेशन अर्थात पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं.

- हॉर्मोन्समध्ये बदल घडू शकतो.

- तणाव वाढू शकतो.

- पोषण कमी होऊ शकतं.

- बॅड कोलेस्टेरॉल वाढू शकतं.

- हृदयविकार जडू शकतात.

- लठ्ठपणा येऊ शकतो.

शुगर क्रॅव्हिंग असलेल्यांनी काय खावं?

- बेरीज (Berries) : गोड खाण्याची इच्छा झाली, तर वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज खाव्यात. त्यासाठी त्या बेरीज घरी आणून ठेवणं आवश्यक आहे. बेरीज खाल्ल्यामुळे शरीराला अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आदी पोषणमूल्यं मिळतील आणि गोड खाल्ल्याचं समाधानही मिळेल.

- डार्क चॉकलेट (Dark Chocolate) : केक, चॉकलेट, कुकीज वगैरे खाणं आवडत असेल, तर त्याऐवजी डार्क चॉकलेटचं सेवन करावं. संशोधनात असं आढळून आलं आहे, की त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यांचा आरोग्याला फायदा होतो.

- चिया सीड्स (Chia Seeds) : चिया सीड्समध्ये ओमेगा थ्री फॅटी अॅसिड्स, फायबर्स आदी आवश्यक घटक मोठ्या प्रमाणावर असतात. चिया सीड्सच्या सेवनामुळे शुगर क्रॅव्हिंग कमी होण्यासही मदत होते. टीव्ही पाहताना किंवा काम करताना बिस्किट्स, केक खाण्याऐवजी रोस्टेड चिया सीड्स खाऊ शकता.

- खजूर (Dates) : खजूर भरपूर पौष्टिक असतात. त्यात तंतुमय पदार्थ, पोटॅशियम, लोह आदी घटक असतात. गोड खाण्याची इच्छा झाली, तर खजूर जरूर खावेत.

- पिस्ता (Pista) : पिस्त्यात हाय प्रोटीन्स, तंतुमय पदार्थ, हेल्दी फॅट्स असतात. त्यांची चांगल्या आरोग्यासाठी आवश्यकता असते. त्यामुळे शुगर क्रॅव्हिंग होईल, त्या वेळी पिस्ता खाऊ शकता.

- ग्रीक योगर्ट (Greek Yogurt) : गोड खाण्याऐवजी ग्रीक योगर्ट खावं. ते चवीला टेस्टी आणि गोड असतं; मात्र ते शरीरासाठी लाभदायक असतं.

- चीज (Cheese) : चीजमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स, गुड फॅट्स, सोडियम, कॅल्शियम आदी घटक असतात. शुगर क्रॅव्हिंग झालं, तर चीज खायला हरकत नाही. चीजचे क्यूब्स आपल्यासोबत कुठेही नेताही येतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स