शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झाडी, काय डोंगर... शिंदेंचा ५० आमदारांपैकी एक पडला; शहाजीबापू पाटलांचा पराभव
2
ठरलं! 'या' दिवशी राज्यात स्थापन होणार महायुतीचं सरकार; कोण होणार मुख्यमंत्री?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचे काय झाले? इस्लामपूरमध्ये महायुती की मविआ जिंकले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: सांगोल्यात काय झाडी काय डोंगराला भगदाड; शहाजीबापू पाटील यांचा पराभव
5
"एका राजपुत्रासाठी आम्ही थांबलो तर..."; सुषमा अंधारेंचं विधानसभा निकालाबाबत मोठं विधान
6
चौरंगी लढतीत दीपक केसरकरांची बाजी, मोठ्या मताधिक्यासह मिळवला विजय 
7
एकनाथ शिंदेंची जोरदार मुसंडी; एकट्याने ठाकरे, पवार, कांग्रेसपेक्षा जास्त जागांवर घेतली आघाडी
8
चारकोपमध्येही भाजपची सरशी, योगेश सागर यांचा विजय जवळपास निश्चित
9
Chitra Wagh : "महायुतीच्या विजयाचे शिल्पकार", स्पष्ट बहुमत दिसताच चित्रा वाघ यांचं ट्विट!
10
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे 'नितीशकुमार' ठरणार की फडणवीसांसारखे युद्ध जिंकूनही हरणार? CM कोण होणार...
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: एक्झिट पोल पुन्हा ठरले फोल! महायुतीला कौल दिला, पण ‘त्सुनामी’चा अंदाज नाही आला!
12
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदेंनी 'करून दाखवलं', विधानसभेत जे बोलले होते, तसंच झालं! उद्धव ठाकरेंना जबर धक्का
13
नैसर्गिक युती तोडल्याचा जनतेच्या मनात राग, महायुतीच्या निकालानंतर विनोद तावडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : मोठी बातमी...! नागपूर दक्षिण-पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत विजय; होणार मुख्यमंत्री?
15
बारामतीची जनता हुशार; एका वाक्यात सुनेत्रा पवारांनी केले विरोधकांना गपगार...
16
मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...
17
Ramtek Vidhan Sabha Election Result 2024: ठाकरेंच्या शिवसेनेला रामटेकमध्ये जबर हादरा!
18
Badnera Assembly Election 2024 Result Live Updates: "आमच्या रामाचं बाण मतदारांनी चालवून दाखवलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार"
19
Kopri Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live: एकनाथ शिंदेच आनंद दिघेंचे खरे वारसदार! पुतण्या केदार दिघेंना किती मतं पडली, पाहा आकडे
20
हाय व्होल्टेज ड्रामा, ते अपक्ष उमेदवारी; शेट्टीचं तिकीट कापलेल्या मतदारसंघात संजय उपाध्यायांची सरशी

कोरोनाच्या माहामारीत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांपासून 'असा' करा बचाव; जाणून घ्या उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 6:29 PM

पावसामुळे पुरेसा सुर्यप्रकाश नसल्याने हवेतील जंतूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.

(Image Credirt- Live chennai)

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की वेगवेगळे आजार मान वर काढायला सुरूवात करतात. कारण वातावरणात झालेल्या बदलांचा प्रकृतीवर परिणाम होत असतो. सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणं अशा समस्या नेहमी उद्भवतात. पण यावर्षी कोरोनाची माहामारी असल्यामुळे सगळ्याच लोकांना आजारी पडण्याची जास्त भीती वाटत आहे. आज आम्ही तुम्हाला कोरोनाच्या माहामारीत पावसाळ्यातील साथीच्या रोगांशी लढण्यासाठी उपाय सांगणार आहोत. 

पावसामुळे पुरसा सुर्यप्रकाश नसल्याने  जंतूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे आपली प्रतिकार यंत्रणा कमकुवत होते. त्यामुळे आजारांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून पावसात भिजणं टाळा, छत्री किंवा रेनकोट घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नका. 

झाडांच्या कुंडीत किंवा डब्यात पाणी साचू देऊ नका. कारण अशा साठवलेल्या स्वच्छ पाण्यातच डेंग्यूच्या डासांची पैदास होत असते. डासांपासून बचाव करणारे जाळ्या, मच्छरदाणी, क्रीम यांचा वापर करावा. घरामध्येही फुलदाणी, फिशटॅंक यांची वेळोवेळी स्वच्छता ठेवावी.  

रोगप्रतिकाशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करा. गाजर, हळदीचे दूध, आलं , लसूण, आहारात समावेश करा. हळदीत  अँटीऑक्सिडंट गुण आहेत. सर्दी आणि खोकल्यासाठी लसूण अतिशय गुणकारी आहे. श्वसनाची समस्या असणाऱ्यांसाठी आले खाणे अतिशय फायदेशीर आहे. उन्हाळा असो किंवा पावसाळा भरपूर पाणी प्या.

व्हिटॅमिन सी असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. व्हिटामीन डी घ्या. बाहेर जाणं शक्य नसेल तर इमारतीच्या गच्चीवर किंवा गॅलरीतून सुर्यप्रकाश अंगावर घ्या. कारण सध्याच्या स्थितीत लॉकडाऊनमुळे व्हिटामीन डी ची कमतरता लोकांच्या शरीरात निर्माण झाली आहे. 

बाहेर पडत नसाल तरी घरच्याघरी २० ते ३० मिनिटं वेळ काढून व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. व्यायाम रोजे केल्याने तुमचं वजन वाढणार नाही. रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहिल. याशिवाय शरीर ताजेतवाने राहून शांत झोप  येईल. जास्तीत जास्त गरम पाण्याचे सेवन करा. जेणेकरून घश्यासंबंधी तक्रारी उद्भवणार नाहीत. बाहेर जाताना मास्कचा वापर, सोशल  डिस्टेंसिंगचं पालन न चुकता करा. 

भारतात तयार होत आहे कोविड19 चे औषध; जाणून घ्या डोस, किंमत याबाबत ८ महत्वाच्या गोष्टी

कानांमार्फतही होऊ शकते कोरोना विषाणूंची लागण? माहीत करून घ्या संक्रमणाबाबत फॅक्ट्स

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या