सध्याच्या काळात वृध्दांनाच नाही तर तरूणांचा सुद्धा अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. मोबाईलचा अतिवापर, खाण्यापिण्याच्या अनियमीत वेळा, झोप पुर्ण न होणे. यांमुळे तरूण मुलांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊन वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. पण तुम्हाला माहीत आहे का २५ ते २५ वर्ष वयोगटातील मुलांमध्ये रक्तदाबासंबंधी समस्यांचे प्रमाण वाढले आहे. आज आम्ही तुम्हाला या वयात असताना या समस्या उद्भवण्यामागचं कारण सांगणार आहोत.
तुमचा विश्वास बसणार नाही पण सध्याच्या काळात खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये असलेला बदल आणि व्यायामाचा अभाव असल्यामुळे तरूण हे रक्तदाबाच्या समस्येला बळी पडत आहेत. तज्ञांच्यामते मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये काम करत असलेल्या सर्वाधिक तरूणांमध्ये ही समस्या जास्त दिसून येते. मुंबई, दिल्ली यांसारख्या शहरात हे आजार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. आरोग्य तज्ञांच्यामते हाय कॅलरी फूड आणि शारीरिक हालचालींचा अभाव यांमुळे तरूणांमध्ये आजार वाढत आहेत. ( हे पण वाचा-वजन कमी करण्यासोबतच त्वचेला आणि केसांना फायदेशीर कढीपत्ता, जाणून घ्या फायदे)
सिटिंग जॉब
तरूणांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. तसंच जास्त तेलयुक्त आणि फॅट्स असणारे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरातील अतिरीक्त चरबीचे प्रमाण वाढत आहे. तसंच सतत बसून काम करण्याची नोकरी असल्यामुळे वजन जास्त वाढत जातं. व्यायाम न केल्यामुळे वजन अधिकाधिक वाढत जातं. यामुळे तरूणांना रक्तदाबाची समस्या उद्भवते. तसंच चहा किंवा कॉफीचं जास्त सेवन केल्यामुळे शरीरातील फॅट्स वाढण्यास चालना मिळत असते. गोड पदार्थांचे जास्त सेवन केल्यामुळे कमरेचा आणि पोटाचा तसंच मांड्याचा आकार वाढत जाण्याची शक्यता असते. वजन वाढल्याने महिलांना मासिक पाळी अनियमीत येण्याच्या समस्या सुद्धा उद्भवू शकतात.
अशी घ्या काळजी
जर रक्तदाबाच्या समस्येकडे वेळीच लक्ष देऊन उपाय केले नाही. तर या त्रासाचे रुपांतर किडनाच्या आजारात सुद्धा होण्याची शक्यता असते. त्यासाठी वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही सतत आजारी पडत असाल तर तुमचा जॉबसुद्धा जाऊ शकतो. फिजीकल एक्टीव्हीटी करण्यासाठी योगा किंवा जीमला जाऊन व्यायाम करा. जर तुम्हाला शारीरीक समस्या जाणवत असतीस तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आपल्या आहारतज्ञांना किंवा डॉक्टरला भेटून तुमचा डाएट प्लॅन करा आणि त्याप्रमाणे आहार घ्या. जर जीमला जाणं शक्य नसेल तर घरच्याघरी व्यायाम करून स्वतःला फिट ठेवा.( हे पण वाचा-'ही' फळं खा अन् मधुमेह नियंत्रणात ठेवा)