(Image credit- medical news today)
उन्हाळ्यात शरीरातील तापमान वाढत असल्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. सतत येत असलेल्या घामामुळे त्वचा विकार सुद्धा असतात. त्यात घामोळ्या, फंगल इन्फेक्शन, यीस्ट इन्फेक्शन यांचा समावेश असतो. उन्हाळ्यात आरोग्याची काळजी व्यवस्थित घेतली नाही तर दवाखान्यात खूप खर्च करून तुम्हाला ट्रिटमेंट घ्यावी लागू शकते. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबाबत टिप्स सांगणार आहोत.
हेल्थ ड्रिक्सचं सेवन करा
उन्हाळ्यात उर्जेसाठी शरीराला एनर्जी ड्रिंकची गरज जास्त असते. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढता येते. उन्हाळ्यात ८ ते १० ग्लास पाण्यासोबतच तुम्ही मिल्कशेक, सॅलेड, पुदिना रस, लिंबू पाणी, काकडी, कलिंगड या पदार्थाचे सेवन करायला हवं.
शरीर हायड्रेट ठेवा
शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी उन्हाळ्यात टरबूज किंवा कलिंगडाचे सेवन फायदेशीर ठरते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर एनर्जी मिळते. या वातावरणात तिखट खाण्यापासून लांब राहायला हवं. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणादरम्यान एनर्जी ड्रिंकचा आहारात समावेश करा. अधिकवेळेपर्यंत शरीर कोरडं राहिल्यामुळे युरिन इन्फेक्शन, डिहायड्रेशन, त्वचा निस्तेज होण्याची समस्या तीव्रतेने उद्भवते.
फ्रिजचं पाणी पिऊ नका
घरी बसून जर तुम्हाला पचनाच्या समस्यांचा सामना करावा लागत असेल म्हणजेच पोट साफ न होणं, एसिडिटी होणं, छातीत जळजळणं अशा समस्या उद्भवत असतील तर फ्रिजमधील पाण्याचे सेवन करू नका. थंडगार फ्रिजचे पाणी पिण्यामुळे तुमची पचनसंस्था मंदावते. ज्याचा चुकीचा परिणाम तुमच्या मेटाबॉलिजमवर होतो. मातीच्या भांड्यातील पाण्यामुळे एसिडिटीचा त्रास कमी होतो. म्हणून माठातलं पाणी प्यायला सुरूवात करा.
डोळ्यांची काळजी घ्या
उन्हामुळे शरीराप्रमाणेच डोळ्यांवर सुद्धा परिणाम होतो. डोळे जळजळणं, धुसर दिसणं, डोळ्यातून पाणी येणं अशा समस्या उन्हाळ्यात जाणवतात. ही स्थिती टाळण्यासाठी थोड्या थोड्या वेळानंतर थंड पाण्याने डोळे धुवा. व्हिटामीन ए व्हिटामीन सी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
ब्रायोनिया एल्वा-२०० या औषधाने ७ दिवसात कोरोनाचे रुग्ण होणार ठणठणीत बरे; पहिली चाचणी यशस्वी
चिंताजनक! कोरोना विषाणूंपेक्षा 'या' दोन आजारांचा धोका जास्त; वेळीच व्हा सावध