शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
3
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
4
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
5
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
6
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
7
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
8
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
9
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
10
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
11
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

डॉक्टर श्रीराम नेने म्हणजेच माधुरीचे पतीच सांगताहेत, हिवाळ्यात कसा कराल ॲलर्जीपासून बचाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 3:54 PM

हिवाळ्यातील ॲलर्जीपासून कसा बचाव करायचा, आणि त्यावर काय उपाय करायचा याबाबत बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचे (Madhuri Dixit) पती डॉ. श्रीराम नेने (Shriram Nene) यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर सविस्तर माहिती दिली आहे. आज तकने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

हिवाळ्यामध्ये एकीकडे गुलाबी थंडी असल्यामुळे अगदी सुंदर असं वातावरण असतं. तर दुसरीकडे याच थंडीमुळे कित्येक जणांना सर्दी-पडसं असे आजार होण्यास सुरूवात होते. केवळ सर्दीच नाही, तर हिवाळ्यात इतरही बऱ्याच समस्यांना (Health issues during winter) सामोरं जावं लागतं. यामध्ये मग ॲलर्जीमुळे वारंवार शिंका येणं, खाज सुटणं अशा गोष्टींचाही समावेश आहे. खरं तर बाकी गोष्टींमुळे ॲलर्जीकडे (Allergies in winter) बऱ्याच वेळा दुर्लक्ष केलं जातं. कित्येक वेळा येणाऱ्या शिंका या सर्दीमुळे असल्याचा समज झाल्यामुळे, त्यावर सर्दीचे उपाय केले जातात. मात्र, वेळीच ॲलर्जी ओळखून (Detect allergies) त्यावर उपाय करणं गरजेचं आहे. याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

हिवाळ्यामध्ये फुलांमध्ये परागसिंचन (Pollination) अधिक प्रमाणात होते. या प्रक्रियेत निर्माण होणारे परागकण हे हवेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात. हे परागकण नाकात गेल्यामुळे कित्येक वेळा आपल्याला ॲलर्जी (What causes allergy) होते. या ॲलर्जीपासून कसा बचाव करायचा, आणि त्यावर काय उपाय करायचा याबाबत बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचे (Madhuri Dixit) पती डॉ. श्रीराम नेने (Shriram Nene) यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर सविस्तर माहिती दिली आहे. आज तकने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

आपल्या व्हिडिओमध्ये डॉ. नेने (Dr. Nene) सांगतात, की ॲलर्जीपासून बचावासाठी आपल्याला स्वच्छता बाळगणे गरजेचे आहे. हिवाळ्यात सहसा आपण भरपूर चादरी, ब्लँकेट्स वापरतो. या गोष्टींची आणि बेडशीट, पिलो कव्हर अशा गोष्टींचीही नियमित स्वच्छता (Cleaning must to avoid allergies) गरजेची आहे. यासोबतच आपल्या शरीराची स्वच्छताही गरजेची आहे. विशेषतः आपले नाक अधिकाधिक स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न आपण करायला हवा.

अशा प्रकारे करा नाकाची स्वच्छताडॉ. नेने यांनी आपल्या व्हिडिओमध्ये नाकाची स्वच्छता (How to clean nose) करण्याची एक सोपी पद्धतही सांगितली आहे. यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घेऊन, तुम्हाला त्यात तुमचे नाक बुडवायचे आहे. असे केल्यामुळे नाकाच्या आत जर काही परागकण अडकले असतील, तर ते निघून जातात. असे केल्यानंतर तुमची ॲलर्जी कमी होईल. तसे न झाल्यास, आपण एखाद्या विशिष्ट फुलाच्या संपर्कात आल्यानंतरच ॲलर्जी (Allergies from flower) होत आहे का हे तपासा. तसेच, प्रत्येक हिवाळ्यातच तुम्हाला ॲलर्जी (Winter allergies) होत असेल, तर या काळात घरातून बाहेर जाणे कमी करण्याचा सल्लाही नेने यांनी दिला.

घरगुती उपायांनी एलर्जी कमी होत नसेल, तर थेट स्टेरॉईड घेऊ नका असा इशाराही नेने यांनी आपल्या व्हिडिओतून दिला. स्टेरॉईड हे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यायला हवेत. कारण आपल्याला नेमकी कशाची आणि कोणत्या प्रकारची ॲलर्जी आहे, हे केवळ डॉक्टरांच्या तपासणीनंतरच स्पष्ट होऊ शकते. तुम्ही डॉक्टरांकडे जाल तेव्हा त्यांना आपल्या ॲलर्जीबाबत पूर्ण माहिती द्या, जेणेकरून ते उपचारांची दिशा ठरवू शकतील, असंही नेने यांनी सांगितले.

कित्येक वेळा डॉक्टर ॲलर्जीबाबत माहिती करून घेण्यासाठी ब्लड टेस्ट (Tests to detect allergies) करतात. तसेच, स्किन ॲलर्जेन टेस्ट (Skin allergen test) या चाचणीच्या मदतीनेही ॲलर्जीबाबत माहिती मिळू शकते. या चाचणीमध्ये व्यक्तीच्या त्वचेवर विविध ॲलर्जेन ठेवले जातात. ज्या ॲलर्जेनची त्वचेवर रिएक्शन दिसून येईल, त्यापासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

एकूणच, हिवाळ्यामध्ये सर्दी पडसे अशा आजारांसोबतच इतर गोष्टींचीही काळजी घेणे गरजेचे ठरते. त्यामुळे तुम्हालाही जर सर्दीशिवाय शिंका येणे किंवा इतर त्रास होत असतील, तर नक्कीच त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी