तुम्ही सेलिब्रिटी असा किंवा सामान्य नागरिक, वजन कमी करणं ही गोष्ट एका रात्रीमध्ये होण्यासारखी अजिबात नाही. यासाठी दिवस रात्र मेहनत घ्यावी लागते. अनेक सेलिब्रिटी आणि त्यांचं फिटनेस पाहून आपण वजन कमी करण्यासाठी इंस्पायर होतो खरे, परंतु त्यांचा डाएट चार्ट सर्वांना फॉलो करणं शक्य असेलचं असं नाही. जर तुम्ही आपलं वाढलेलं वजन कमी करण्याच्या विचारात असाल, तर याबाबतीत टेनिस स्टार सानिया मिर्जाकडून टिप्स घेऊ शकता. द नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सानियाने प्रेग्नेंसीनंतर फक्त 5 महिन्यांमध्येच 22 किलो वजन कमी केलं आहे. जाणून घेऊया सानियाच्या वेट लॉस प्लॅनबाबत...
प्रेग्नंसीमध्ये 89 किलो होतं वजन
प्रेग्नंसीमध्ये सानियाचं वजन फार वाढलं होतं आणि तिच्यासाठी ते कमी करणं शक्य नव्हतं. परंतु डिलिवरीनंतर 5 महिन्यांमध्येच तिने 22 किलो वजन कमी केलं. जेव्हा सानिया प्रेग्नंट होती, तेव्हा तिचं वजन 89 किलो होतं. डिलिवरीनंतर 15 दिवसांनी तिने वर्कआउट करणं सुरू केलं. परिणाम असा झाला की, 5 महिन्यानंतर तिचं वजन 67 किलो होतं.
सानिया सर्व मातांसाठी प्रेरणा आहे. ती जे वर्कआउट करते. त्याचे व्हिडीओ #mamahustles या हॅशटॅगसह पोस्ट करते. याबाबत तिला विचारल्यावर तिने सांगितले की, यामागील कारण म्हणजे, आई झाल्यावरही तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता. हे मला इतर महिलांपर्यंत पोहोचवायचं आहे.
प्रीनेटल योगपासून प्रत्येक अॅक्टिव्हीटी
सानियाने हा निर्णय घेतला आहे की, ती प्रेग्नेंसीदरम्यानही ती स्वतःला अॅक्टिव्ह ठेवणार. त्यासाठी तिने प्रीनेटल योगचा आधार घेतला आणि वर्कआउटही सुरू ठेवलं.
... म्हणून घेतला वजन कमी करण्याचा निर्णय
सानिया आपल्या वाढलेल्या वजनाने खूश नव्हती आणि म्हणूनच तिने आपलं वजन कमी करण्याचा निर्णय घेतला.
एका इंटरव्यूमध्ये तिने सांगितले होते की, 'मी टेनिस खेळत असो किंवा नसो. परंतु जेव्हा मी स्वतःला आरशामध्ये पाहाते त्यावेळी मला असे वाटते की, मी पहिल्यासारखी अजिबात वाटत नाही. जशी आधी होते.
4 तासांसाठी वर्कआउट आणि कार्डिओ
सानिया खाण्याची शौकीन असून डिलिवरीनंतर मात्र तिने आपलं डाएट अगदी काटेकोरपणे फॉलो केलं.
ती दररोज जिममध्ये 4 तासांसाठी वर्कआउट करते. याव्यतिरिक्त 100 मिनटांसाठी कार्डिओ, एका तासासाठी किक बॉक्सिंग आणि पिलाटेचंही ट्रेनिंग घेते.
योग
या सर्व एक्सरसाइज व्यतिरिक्त सानियाने योगाभ्यासाचाही आपल्या डेली रूटीनमध्ये समावेश केला होता. त्यामुळेच ती आपलं वजन कमी करून फिट दिसत आहे.