Garlic in Monsoon : लसणाच्या नियमित सेवनाने आरोग्याला किती फायदे होतात हे तुम्हाला माहीत आहे. फार पूर्वीपासून लसणाचा वापर आपल्या रोजच्या आहारात केला जातो. लसणाच्या सेवनाने आरोग्य चांगलं राहतं. बरेच लोक लसणाचं सेवन वेगवेगळ्या पद्धतीने करतात.
डॉक्टरांचं असं मत असतं की, पावसाळ्यात अनेक आजारांचं इन्फेक्शन पसरत असतं. लसणाने रोग प्रतिकारक क्षमता वाढते. तसेच डॉक्टर सांगतात की, लसणाच्या सेवनाने शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करता येतं. ज्याव्दारे हार्ट अटॅक (Heart Attack) आणि स्ट्रोक (stroke) चा धोका कमी होतो.
आजकाल लोकांमध्ये वेगवेगळ्या चुकीच्या सवयींमुळे बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हल वाढते. ही कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी एक खास आयुर्वेदिक उपाय आहे. तो म्हणजे लसूण. बॅड कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठी लसूण हा सगळ्यात बेस्ट उपाय मानला जातो.
लसूण कसा कमी करतो कोलेस्ट्रॉल?
लसणामध्ये एलिसिन आणि मॅगनीज तत्व असतात. हे दोन्ही तत्व कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी मदत करतात. लसणामध्ये अॅंटी वायरल आणि अॅंटी फंगल तत्वांसोबतच अॅंटी-ऑक्सिडेंट्सही असतात. ज्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.
कसं करावं लसणाचं सेवन?
कच्चा लसूण खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. तसेच लसूण जर तूपामध्ये भाजून खाल्ला तरीही कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होऊ शकते.
किती खावा लसूण?
एका दिवसात कच्च्या लसणाच्या केवळ एक ते दोन कळ्या खाव्या. तसेच भाजीमध्ये साधारण ५ ते ६ कळ्या लसूण टाकावा. जास्त लसूण खाल्ल्याने नुकसानही होऊ शकतं.
कधी खावा लसूण?
तसे तर तुम्ही कोणत्याही वेळी लसूण खाऊ शकता. पण लसणाचे फायदे जास्त मिळवायचे असतील तर लसूण कधीही रिकाम्या पोटी खावा. रोज सकाळी लसणाची एक कळी रिकाम्या पोटी खाल्ली आणि त्यावर कोमट पाणी प्यायले तर जास्त फायदा होईल.