How to Use Tulsi : तुळशीचं झाड जवळपास प्रत्येक घरांमध्ये असतं. तुळशीच्या झाडाला धार्मिक महत्व तर आहेच सोबतच तुळशीचा वापर हजारो वर्षांपासून औषधी म्हणून केला जातो. आयुर्वेदात तुळशीला फार महत्व आहे. तुळशीचा वापर लोक वेगवेगळ्या पद्धतीने करतात. बरेच लोक चहामध्ये तुळशीची पाने टाकतात. सर्दी-खोकला, ताप दूर करण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर केला जातो.
तुळशी केवळ पानेच नाही तर तुळशीची मूळं, फांद्या, बीया सगळ्याच फायदेशीर ठरततात. याने इम्यूनिटी वाढते, तणाव कमी होतो, पचनक्रिया सुधारते, लिव्हर आणि किडनीची सफाई होते तसेच ब्लड शुगर लेव्हलही याने कंट्रोल करता येते. पण अनेकांना तुळशीचा वापर कसा करावा हे माहीत नसतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कसा कराल तुळशीचा वापर?
खोकला आणि सर्दीपासून सुटका मिळवण्यासाठी तुळशीची पाने चावून खाऊ शकता किंवा पाने वा बीया उकडत्या पाण्यात टाकून चहा बनवू शकता. तुळशीचा पाने गरम पाण्यात भिजवून ठेवून या पाण्याचं सेवन करू शकता. रिकाम्या पोटी या पाण्याचं सेवन केल्यास जास्त फायदा मिळेल. तसेच तुळशीच्या पानांचा वापर तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांमध्ये करू शकता.
सर्दी-खोकला, घशातील खवखव
तुळशीची पाने कोणत्याही वातावरणात फायदेशीर ठरतात. खोकला दूर करण्यासाठी तुळशीच्या रसात थोडं मध टाकून सेवन केलं जातं. तसेच शरीरातील कफही याने बाहेर पडतो. इतकंच नाही तर तुळशीने घशातील खवखव दूर होण्यासही मदत मिळते. तुळशीची पाने पाण्यात उकडून सेवन करू शकता किंवा या पाण्याने गुरळा करू शकता.
किडनीसाठी फायदेशीर
तुळशीचा वापर तुम्ही किडनी स्टोनची समस्या दूर करण्यासाठी करू शकता. किडनी स्टोन असलेल्या लोकांनी तुळशीच्या पानांचा रस मधासोबत सेवन केल्यास फायदा मिळेल. आयुर्वेदानुसार, लघवीच्या माध्यमातून स्टोन बाहेर काढण्यासाठी याचं सेवन करावं.
डायबिटीस
तुळशीमुळे डायबिटीसच्या रूग्णांमध्ये हाय शुगर, कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास याने मदत मिळते. ग्लोबल सायन्स रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, रिकाम्या पोटी सकाळी दोन ते तीन तुळशीची पाने किंवा एक चमचा तुळशीचा रस प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत मिळते.
स्कीन इन्फेक्शन आणि स्ट्रेस
तुळशीमधील अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अॅंटी-वायरल तत्व त्वचेचं इन्फेक्शन दूर करण्यास मदत करतात. तुळशीचा रस त्वचेवर लावल्याने फंगल इन्फेक्शन आणि त्वचेसंबंधी इतर समस्या दूर होतात. तसेच तुळशीच्या सेवनाने स्ट्रेस कमी करण्यासही मदत मिळते.
हार्ट हेल्थ आणि बीपी
तुळशीमध्ये व्हिटॅमिन सी आणि यूजेनॉलसारखे अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. जे हृदयाचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात. तसेच तुळशीने ब्लड प्रेशर कमी करता येतं. यात पोटॅशिअम, व्हिटॅमिन ए भरपूर असतं. चांगल्या फायद्यासाठी आठवड्यातील सहा दिवस याचं सेवन केलं पाहिजे.