How To Use Turmeric For Weight Loss : आजकालच्या खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे लठ्ठपणा एक गंभीर समस्या बनली आहे. जास्तीत जास्त लोक लठ्ठपणाने हैराण आहेत. डायटिंग आणि जिममध्ये तासंतास मेहनत करूनही त्यांचं वजन कमी होत नाही. अशात तुम्ही तुमच्या डेली रूटीनसोबतच काही घरगुती उपायही करू शकता. घरगुती उपायांमध्ये हळद खूप महत्वाची मानली जाते. हळदीने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. याचा वापर तुम्ही वजन कमी करण्यासाठी देखील करू शकता. याच्या सेवनाने पोटावरील चरबी सुद्धा कमी होईल. अशात हळदीचा वापर कसा करावा हे जाणून घेऊ.
वजन कमी करण्यासाठी हळद
तुम्हाला जर तुमचं वाढलेलं वजन कमी करायचं असेल तर तुमच्यासाठी हळदीचं सेवन खूप फायदेशीर ठरतं. हळदीमध्ये करक्यूमिन नावाचं तत्व असतं, जे फॅट बर्न करण्यासाठी मदत करतं. याच्या सेवनाने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि शरीरातील सूजही कमी होते. याच्या नियमित सेवनाने पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत मिळते.
कसं कराल हळदीचं सेवन?
हळदीचं पाणी
वजन कमी करण्यासाठी तुम्ही हळदीच्या पाण्याचं सेवन करू शकता. हळदीने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं, ज्यामुळे फॅट बर्न करण्यास मदत मिळते. हे तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा हळद टाकून पाणी उकडून घ्या. नंतर हे पाणी थंड झाल्यावर गाळून सेवन करा. रोज सकाळी रिकाम्या पोटी या पाण्याचं सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळेल.
हळद आणि लिंबू पाणी
हळद आणि लिंबू पाण्याचं सेवन वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. यासाठी तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकून रिकाम्या पोटी सेवन करा. याच्या नियमित सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि वजन कमी करण्यास मदत मिळते. तसेच पचनासंबंधी अनेक समस्याही दूर होतात.
हळदीचं दूध
हळदीचं दूध प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. याच्या सेवनाने वजन कमी करण्यास मदत मिळते. यासाठी एक ग्लास गरम दुधात एक चमचा हळद पावडर चांगल्याप्रकारे मिक्स करा. रोज रात्री झोपण्याआधी याचं सेवन करा. याच्या नियमित सेवनाने वजन वेगाने कमी होतं. सोबतच इम्यूनिटी बूस्ट होते आणि झोपही चांगली लागते.