Mouth Ulcers : तोंड येणं म्हणजे तोंडात फोड येणे म्हणजे एकप्रकारची जखम असते. ही जखम तोंडात कुठेही होऊ शकते. याचा रंग सामान्यपणे लाल किंवा पिवळा असतो. हा फोड फारच वेदनादायी असतो. पण संक्रामक नसतो. याने पीडित व्यक्ती गरम आणि तिखट पदार्थांबाबत अति संवेदनशील होते. तोंडातील फोडं आकाराने वेगवेगळे असतात. हे सामान्यपणे दोन आठवड्यात ठीक होतात. पण जास्त काळ ते राहिले तर गंभीर आजाराचे संकेत होऊ शकतात.
तोंडात फोड होण्याचं कोणतं एक कारण अजून समजू शकलेलं नाही. पण वेगवेगळ्या व्यक्तींना ते वेगवेगळ्या कारणाने होतात. सामान्यपणे हे हार्मोनल असंतुलन, अॅसिडीटी, बद्धकोष्टता, व्हिटॅमिन बी आणि सी ची कमतरता, तसेच आयर्न आणि इतर पोषक तत्व कमी असल्यानेही होतात. त्यासोबतच धुम्रपान, मसालेदार खाणं, दात, जीभ किंवा गालाची स्कीन कापली गेल्याने, तणाव, गर्भधारणा आणि जेनेटिक कारणांमुळेही तोंड येतं. चांगली बाब ही आहे की, यावर काही घरगुती उपायही आहेत.
सर्वच वयोगटातील लोकांनी तोंडात फोड येतात. जास्त काळ तोंडात फोड राहण्याचा धोकादायक मानलं जातं. या फोडांमुळे काही गंभीर आजारांचे संकेतही मिळतात.
मधुमेह
इम्यून डिसऑर्डर
आतड्यांवर सूज
सीलिएक डिजीज
बेहेट डिजीज
एड्स(HIV)
तुळशीची पाने
तुळशीची पाने आपल्या औषधी गुणांसाठी ओळखली जाते आणि प्राचीन काळापासून याचा वापर वेगवेगळ्या समस्यांसाठी केला जातो. जर तुम्हाला तोडांतील फोडाची समस्या दूर करायची असेल तर तुळशीची काही ताजी पाने चावा आणि सोबतच थोडं पाणी प्या. दोन तीन दिवस असंच केल्याने तोंडातील फोड दूर होईल.
अॅलोवेरा ज्यूस
जर तुमचं तोंड आलं असेल तर आराम मिळवण्यासाठी दिवसातून दोन-तीन वेळा थोड्या प्रमाणात अॅलोवेरा ज्यूसचं सेवन करा. अॅलोवेरामध्ये सूज कमी करण्याचे गुण असतात. अॅलोवेराचा रस पोटातील अल्सर दूर करण्यासाठीही फायदेशीर मानला जातो.
जेष्ठमध
जेष्ठमध पोटाच्या समस्येमुळे तोंडात होणाऱ्या फोडांना दूर करण्यास मदत करतं. हे तुम्ही पाण्यासोबत किंवा मधासोबत सेवन करू शकता. याने पोट साफ होतं आणि अल्सरचं कारण ठरणारे विषारी पदार्थही दूर होतात.
आंबट फळं
तोंड येण्याचं कारण व्हिटॅमिन सी ची कमतरता हेही आहे. शरीरात याची कमी पूर्ण करण्यासाठी संत्र्यासारखी व्हिटॅमिन सी ने भरपूर फळांचं सेवन करणं फायद्याचं आहे. तुम्ही दिवसातून दोन संत्री खाऊ शकता
दही
अनेकदा उष्णतेमुळेही तोंडात फोड येतात. अशात यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही दह्याचं सेवन करू शकता. दही थंड असतं. त्यामुळे आराम मिळतो. याने पोटही थंड राहतं.