पिवळ्या आणि दुर्गंधी देणाऱ्या दातांमुळे अनेकदा चारचौघांमध्ये लाजिरवाण्या क्षणांचा सामना करावा लागतो. तुम्ही रोज ब्रश करत असूनही तुमचे दात पिवळे असतील, त्यातून दुर्गंधी येत असेल आणि हिरड्यांमधून रक्त येत असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय ट्राय करू शकता. दात स्वच्छ करण्यासाठी काही नियम आहेत जे तुम्ही नेहमीच फॉलो केले पाहिजेत. त्यासोबतच असे पदार्थ खावेत ज्यामुळे ते चमकदार आणि मजबूत होतील. दातांना निरोगी ठेवण्यासाठी केवळ बाजारातील टूथपेस्टवर अवलंबून राहून चालत नाही. काही घरगुती उपायही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
मोहरीचं तेल आणि मीठ
या दोन्ही गोष्टी पूर्णपणे क्लीन्जरसारखं काम करतात आणि सोबतच तोंडाची दुर्गंधीही दूर करतात. दातांवरील पिवळेपणा घालवण्यासोबतच या मिश्रणाने दातांवरील कीड, रक्तस्त्राव आणि हिरड्यांवरील सूज यांसारख्या गंभीर समस्या दूर करता येतात.
- कशामुळे दात होतात खराब
जास्त गोड खाल्ल्याने
तोंडाची योग्य काळजी न घेणे
नियमितपणे दात स्वच्छ न करणे
नियमितपणे चेकअप न करणे
कोणत्याही स्वरूपात तंबाखूचं अधिक सेवन
सतत खाऱ्या पाण्याचं सेवन केल्याने
- दातांसाठी फायदेशीर मीठ
मोहरीचं तेल आणि मीठ एक पूर्वीपासून वापरला जाणारा घरगुती उपाय आहे. ज्याचा वापर हिरड्या साफ करणे आणि दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी केला जातो. एका रिसर्चनुसार, मीठ एका हलक्या घर्षणाच्या रूपात काम करतं, ज्यामुळे दात चमकदार होतात. त्यासोबतच यात फ्लोराइडचा एक नैसर्गिक स्त्रोतही आहे. जो दात आणि हिरड्यांसाठी फायदेशीर आहे.
मोहरीचं तेलही फायदेशीर
एका रिसर्चनुसार, मोहिरीच्या तेलाने तुमच्या हिरड्या मजबूत होतात आणि दातांवरील प्लाक दूर होतं. प्लाक सामान्यपणे बॅक्टेरियाच्या कारणामुळे बनतं. जे दातांवर दिसतं. मोहरीच्या तेलाने ते दूर होतं. तसेच हिरड्यांमधून रक्त येत असेल तर तेही याने थांबतं. या दोन्ही गोष्टींचा वापर हिरड्यांवरील सूज कमी करता येते आणि रक्तस्त्राव काही प्रमाणात नियंत्रित केला जाऊ शकतो.
कसा करावा वापर?
फक्त एक चिमुटभर मीठ किंवा सैंधव मीठ घ्या. यात काही थेंब मोहरीचं तेल टाका. हे मिश्रण बोटाच्या मदतीने दातांवर हलक्याने घासा. जवळपास दोन ते तीन मिनिटे अशी मालिश करा. नंतर गरम पाण्याने तोंड धुवा. याचा वापर नियमितपणे करा.