शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

तुम्हीही पाणी पिताना या चुका करता का? लगेच सुधारा नाही तर होऊ शकतो कॅन्सर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 11:01 AM

Mistakes While Drinking Water : हेल्थ एक्सपर्टही नेहमी हेच सांगतात की, आपण जेवढं जास्त पाणी पिऊ तेवढं चांगलं असतं. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरापासून अनेक आजार दूर राहतात.

Mistakes While Drinking Water : पाण्याचं आपल्या जीवनात किती महत्व आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पाणी नाही मिळालं तर काय होतं यावरूनच हे कळतं. इतकंच नाही तर आपल्या शरीरातही 75 टक्के पाणी असतं. पाण्याशिवाय आपलं जीवन जगणं अशक्य आहे. हेल्थ एक्सपर्टही नेहमी हेच सांगतात की, आपण जेवढं जास्त पाणी पिऊ तेवढं चांगलं असतं. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरापासून अनेक आजार दूर राहतात.

पाणी प्यायल्याने तुम्ही दिवसभर फ्रेश राहता. डॉक्टरांचा सल्ला असतो की, तुम्ही दिवसातून कमीत कमी 2 ते 3 लीटर पाणी प्यायला हवं. कारण शरीरात पाण्याची कमी झाली तर सेल्सना योग्यपणे ऑक्सिजन मिळत नाही. पण पाणी पिताना तुम्हाला हेही माहीत असायला हवं की, पाणी पिताना तुम्ही कही चुका तर करत नाही ना? कारण पाणी पिताना काही चुका केल्या तर तुम्हाला समस्याही होऊ शकतात. असाच एक रिपोर्ट समोर आला आहे. ज्यात सांगण्यात आलं आहे की, जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पाणी पित असाल तर तुम्हाला कॅन्सरही होऊ शकतो.पाणी पिताना केल्या जाणाऱ्या चुका

1) प्लास्टिक बॉटलमधून पिऊ नका पाणी

आजकाल प्लास्टिकचा वापर खूप वाढला आहे. लोक पाणी पिण्यासाठी जास्तीत जास्त प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, प्लास्टिकची बॉटल आरोग्यासाठी किती नुकसानकारक आहे. एका रिसर्चनुसार, प्लास्टिकच्या बॉटलमध्ये मायक्रोप्लास्टिक असतात. याने प्लास्टिकचा कचरा पाण्याती मिक्स होतो आणि हेच मायक्रोप्लास्टिक रक्तात पोल्यूशन पसरवतं. यानेच पाणी पिण्याचा मार्ग म्हणजे गळ्याचे अवयव खराब होतात. ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.

2) किती पाणी प्यावं?

जर तुम्ही भरपूर पाणी पित असाल तर याने तुम्ही डिहायड्रेशनपासून वाचता. जास्त गरमी असेल तेव्हा भरपूर पाणी प्यायला हवं. शरीरात पाणी कमी झालं तर चक्कर येतात. एक्सपर्ट्स सांगतात की, वयस्क व्यक्तीने शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसातून 7 ते 8 ग्लास पाणी प्यावं.

3) पाणी कसं प्यावं?

जास्तीत जास्त लोक पाणी पिताना काही चुका करतात. जसे की, फ्रीजमध्ये ठेवली बॉटल काढून लगेच पाणी पिणे. सोबतच काही लोक एकाचवेळी भरपूर पाणी पितात. इतकंच नाही तर जेवणादरम्यान आणि जेवण केल्यावर लगेच पाणी पितात. जे चुकीचं आहे. हाय मिनरल्स असलेलं पाणी पिणं टाळलं पाहिजे. या सगळ्या सवयींमुळे तुम्ही आजारी पडू शकता. उभं राहून पाणी पिऊ नका. थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावं. 

4) कधी पाणी पिणे फायदेशीर

आंघोळ करण्याच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्याने ब्लड प्रेशरची समस्या राहत नाही आणि झोपण्याआधी पाणी प्यायल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. एक्सरसाइज केल्यावर पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या होणार नाही.

5) असं अजिबात करू नका

आयुर्वेदानुसार, पाणी शांतपणे खाली बसून आरामात प्यावे. उभं राहून गटागट पाणी प्यायल्याने पाणी वेगाने पोटाच्या खालच्या भागात जातं. त्यामुळे पाण्यातील पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत आणि वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. तसेच पाणी एकदाच गटागट करून पिऊ नये. एक एक घोट घेत हळू पाणी प्यावे. याचं कारण आपण जेव्हा पाणी पितो तेव्हा पाण्यासोबत आपली लाळही पोटात जाते. याने पचनक्रिया मजबूत होण्यास मदत मिळते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य