शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलदरम्यान बीसीसीआयची मोठी कारवाई, सहाय्यक प्रशिक्षकांसह तिघांना पदावरून हटवलं!
2
'बह्मोस' भारताला आणखी मालामाल करणार, हा छोटासा देश चीनशी टक्कर घेणार; होणार 700 मिलियन डॉलरची डील!
3
सुरेश धस-धनंजय मुंडे आज एकत्र दिसणार?; शिरूर कासारमधील सोहळ्याकडे राज्याचं लक्ष
4
राज्यात आता रोबोट करणार मॅनहोलची सफाई, २७ महापालिकांसाठी १०० रोबोट
5
"मी माझी फिल्म बघितली अन्.."; 'सुशीला सुजीत' सिनेमा पाहिल्यावर सोनाली कुलकर्णी काय म्हणाली?
6
जगातील निम्मे सोने असूनही बुडाला देश; अर्थव्यवस्था रुळावर यायला लागले तब्बल १२ वर्षे
7
Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला मिळतील १६,६५० रुपये
8
Video - धक्कादायक! चालता बोलता 'तो' खाली कोसळला, सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यूचा संशय
9
टाईम मॅगझीनच्या 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत एकही भारतीय नाही, ट्रम्प-युनूस यांचा समावेश; असं आहे कारण
10
जगभर : युक्रेनच्या स्त्रिया शिवताहेत ‘किकिमोरा वॉरसूट्स’, युद्धातील संघर्ष कथा
11
IPL 2025: हाच खरा 'मॅचविनर'! अवघ्या १२ चेंडूत मिचेल स्टार्कने फिरवला सामना, संघ विजयी
12
बहुतेक लोकांना 'या' लोनबद्दल माहितीच नाही, Personal Loan पेक्षाही स्वस्त आणि EMI चं टेन्शनही नाही
13
बँड, बाजा आणि जेल! लग्न होताच अटक; ४ गुन्हेगारांना पकडण्यासाठी १५३ पोलिसांचा फौजफाटा
14
लेख: ‘रोजगार हमी’चा खर्च तिप्पट; मजुरांना पैसे मिळाले का?
15
भल्यामोठ्या अजगरासह बाथटबमध्ये आंघोळ करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल
16
"मधुबाला शेवटी एकटी पडली, किशोर कुमार यांनी दुर्लक्ष केलं", बहीण मधुर भूषण यांचा खुलासा
17
बाबा रामदेव यांच्या पतंजलीची अदार पूनावाला यांच्या कंपनीसोबत मोठी डिल; नवीन क्षेत्रात उडी
18
रेणुका शहाणेंनी आशुतोष राणांसोबत कधीच काम का नाही केलं? अभिनेत्री स्पष्टच म्हणाली- "ऑफर्स आल्या पण..."
19
गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये बनावट पनीर? इन्फ्लुएन्सरचा दावा; हॉटेलने केली अशी कमेंट
20
"तिच्या अंगाची दुर्गंधी येते"; प्रतिस्पर्ध्याला वापरण्यास सांगितले डीओ; टेनिसमधला अजब प्रकार

पोट साफ होण्यासाठी तासंतास जोर लावण्याची येणार नाही वेळ, फॉलो करा 'हे' सोपे उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 13:40 IST

Home Remedies For Constipation: बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी रात्री एक कप दुधात एक गोष्ट मिक्स करून पिऊ शकता. इतरही काही उपायांनी ही समस्या तुम्ही दूर करू शकता.

Home Remedies For Constipation: उत्सवाच्या दिवसांमध्ये घराघरांमध्ये एकापेक्षा एक टेस्टी पदार्थ खाल्ले जातात. बाहेरूनही भरपूर मिठाई आणली जाते. अशात या दिवसात जास्त तेलात तळलेल्या पदार्थांमुळे पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. अनेकांना बद्धकोष्ठतेची म्हणजे पोट साफ न होण्याची समस्या होते. टॉयलेटमध्ये तासंतास बसून आणि जोर लावूनही पोट लवकर साफ होत नाही. अशात बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी रात्री एक कप दुधात एक गोष्ट मिक्स करून पिऊ शकता. इतरही काही उपायांनी ही समस्या तुम्ही दूर करू शकता.

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी उपाय

दूध आणि तूप

रात्री एक कप गरम दुधात एक चमचा तूप टाकून सेवन केल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. तूप आणि दुधात लॅक्सेटिव असतं आणि याच्या सेवनाने आतड्या साफ होतात. रात्री अशाप्रकारे दुधाचं सेवन केल्याने सकाळी पोट सहजपणे साफ होतं.

दही आणि अळशीच्या बीया

एक वाटी दुधात अळशीच्या भाजलेल्या बीया टाकून सेवन केल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल. दह्याने पोटाला प्रोबायोटिक्स मिळतात तर अळशीच्या बियांमधून फायबर मिळतं.

आवळ्याचा ज्यूस

एक ग्लास पाण्यात ३० मिली आवळ्याचा ज्यूस मिक्स करून सेवन केल्यास पचनक्रिया चांगली होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. 

फायबर असलेली फळं

फायबर भरपूर प्रमाणात असलेल्या फळांचं सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळते. सफरचंद, पेरू आणि पेर यातून शरीराला भरपूर फायबर मिळतं.

भरपूर पाणी प्या

बद्धकोष्ठतेची समस्या अनेक डिहायड्रेशनमुळेही होऊ शकते. अशात भरपूर पिणं फायदेशीर ठरू शकतं. केवळ साधं पाणीच नाही तर लिंबू पाणी, फळं किंवा भाज्यांचा ज्यूस सेवन करूनही बद्धकोष्ठतेची समस्या दूर करता येते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य