अनेकदा तुम्ही असे लोक पाहिले असतील जे दिसायला फारच आकर्षक दिसतात आणि त्यांचं राहणीमानही भारी असतं. पण त्यांनी तोंड उघडलं की, त्यांचे पिवळे दात (Yellow Teeth) त्यांच्या आकर्षक पर्सनॅलिटीला डाग लावतात. अशा लोकांना चार चौघात मनमोकळेपणाने हसताही येत नाही. अशा लोकांना आम्ही पिवळे दात पांढरे चमकमकीत करण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. या उपायांनी दातांचा पिवळेपणा दूर होईल आणि दात मजबूतही होतील.
असं मानलं जातं की, मजबूत आणि चमकदार दातांनी तुमची पर्सनॅलिटीही आकर्षक होते आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहतं. दात मजबूत करण्यासाठी कॅल्शिअम रिच फूड्स खाण्याचा सल्ला दिला जातो. पण दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे पदार्थ खातात, पण दातांचा पिवळेपणा काही दूर होत नाही.
दातांच्या पिवळेपणाचं कारण
दातांवर पिवळेपणा स्मोकिंग, ओरल हायजिनची काळजी न घेणे, जेनेटिक किंवा खराब डाएटमुळे येतो. त्यामुळे सर्वच लोकांनी या गोष्टींकडे लक्ष द्यावं नाही तर दातांचा पिवळेपणा वाढतच जाणार.
'या' खास फूड्समुळे दूर होतो दातांचा पिवळेपणा
- सर्वातआधी तर सकाळी आणि सायंकाळी दात ब्रश करण्याची सवय लावा. त्यासोबतच शक्य असेल तर रोज सकाळी एक सफरचंद खा. अनेक रिसर्चनुसार, सफरचंदमध्ये मॅलिक अॅसिड असं. जे तोंडात लाळ तयार करतं आणि ही लाळ दातांचा पिवळेपणा दूर करण्यास मदत करते.
- त्यासोबतच केळ्यानेही दातांचा पिवळेपणा दूर होतो. केळींमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी, डायटरी फायबर, व्हिटॅमिन बी ६ आणि मॅगनीज आढळून येतात. याने दात साफ होण्यास मदत मिळते. तसेच केळ्याच्या सालीचा पांढरा भाग जर १ ते २ मिनिटांसाठी दातांवर घासला तर याने केळ्याच्या सालीतील पोषक तत्व दातांना मिळतात. असं म्हटलं जातं की, यानंतर ब्रश नक्की करा. आठवड्यातू ३ वेळा असं केलं तर तुमचे दात चमकदार दिसू लागतील.
- स्ट्रॉबेरीही दातांचा पिवळेपणा दूर करण्यात फायदेशीर आहे. मॅलिस अॅसिड नावाचं नॅच्युरल एंजाइम स्ट्रॉबेरीमध्ये आढळून येतं. ज्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो आणि दात चमकदार होण्यास मदत मिळते. सोबतच स्ट्रॉबेरीमध्ये असलेल्या फायबरने तोंडातील बॅक्टेरियाही दूर होण्यास मदत मिळतो.