शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

पावसाळ्यात मुलांना सर्दी-पडसे होण्याची भीती वाटते? वेळीच करा 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 4:06 PM

मिशिगन सीएस मॉट चिल्ड्रन रुग्णालयाने केलेल्या सर्व्हेनुसार, तीन ते सहा वर्षांच्या मुलांना दर वर्षी एक ते दोन वेळा सर्दी नक्कीच होते. ही सर्दी सुमारे दोन आठवड्यांपर्यंत राहू शकते.

पावसाळ्यात सर्दी-पडसं (Viral Cold and Fever) होणं ही साधारण बाब असते. वातावरणातला बदल, पाण्याशी आलेला संपर्क, अशा बऱ्याच गोष्टींमुळे अनेक जण आजारी पडतात. विशेषतः लहान मुलांना याचा धोका अधिक असतो. मिशिगन सीएस मॉट चिल्ड्रन रुग्णालयाने केलेल्या सर्व्हेनुसार, तीन ते सहा वर्षांच्या मुलांना दर वर्षी एक ते दोन वेळा सर्दी नक्कीच होते. ही सर्दी सुमारे दोन आठवड्यांपर्यंत राहू शकते. अर्थात यापासून बचावासाठी आपल्याकडे कित्येक घरगुती उपाय (Home remedies for Cold and Cough) परंपरागत चालत आले आहेत. यातल्या काही उपायांची माहिती घेऊ या. 'हेल्थशॉट्स' या वेबसाइटने याबाबतच्या माहितीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

अशी घ्या खबरदारीसध्या कोरोनामुळे सर्वांनाच वैयक्तिक स्वच्छतेचं महत्त्व माहिती झालं आहे. आपल्या मुलांनाही वारंवार हात-पाय धुण्याची सवय (Habit of Cleaning Hands) लावणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी साबण-पाणी उपलब्ध नसेल, त्या ठिकाणी अल्कोहोल-बेस्ड हँड सॅनिटायझर वापरणंही योग्य ठरते. शिंकल्यामुळे किंवा अन्य गोष्टींमुळे सर्दीचे विषाणू विशेषतः हातावर राहतात. हे हात डोळे, तोंड, नाक अशा ठिकाणी लागल्यास त्यामार्फत विषाणू (Germs enter through face, nose and eyes) शरीरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे तुम्ही स्वतःदेखील वारंवार हात धुण्याची सवय लावायला हवी आणि मुलांनाही त्याबद्दल मार्गदर्शन करावं. तसेच, मुलांना तोंड, डोळे, नाक अशा ठिकाणी वारंवार स्पर्श न करण्यासही सांगावं.

फ्लूची लक्षणंताप येणं, थंडी वाजणं आणि अंगदुखी ही फ्लूची (Symptoms of Flu) सर्वसाधारण लक्षणं आहेत. दहा दिवसांपेक्षा जास्त काळ ही लक्षणं दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं ठरतं. मूल तीन महिन्यांपेक्षा कमी वयाचं असेल, तरी आजारी पडल्यानंतर त्वरित डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. मुलाला झालेली सर्दी हवामानातल्या बदलामुळे झालेली साधारण सर्दी (Viral Cold) आहे, की फ्लू आहे याचं निदान डॉक्टर करू शकतात. त्यानुसार मग तुम्ही पुढील उपचार करू शकता.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपायआपल्याकडे आजीबाईंच्या बटव्यात लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती (Immunity Boosting in Kids) वाढवण्यासाठी कित्येक उपाय आहेत. त्यातला एक उपाय म्हणजे ओव्याचं पाणी. आपल्याला माहिती आहे की ओवा हा पोटदुखीसाठी गुणकारी असतो; मात्र रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही त्याचा वापर होऊ शकतो. यासाठी एक मोठा चमचा भरून ओवा एक ग्लास पाण्यात (Ajwain Water benefits) उकळून घ्या. हे पाणी निम्मं होईपर्यंत उकळत राहा. त्यानंतर हे पाणी थंड करून थोड्या-थोड्या वेळाने एक-दोन चमचे एवढ्या प्रमाणात मुलांना पाजत राहा. मूल मोठं असेल तर अर्धा कप पाणी प्यायला देण्यासही हरकत नाही.

यासोबतच हळदीच्या दुधाचे (Turmeric Milk Health Benefits) औषधी गुणधर्मदेखील तुम्हाला माहिती असतील. खोकला झाल्यानंतर जवळपास सर्वांच्या घरात पहिल्यांदा त्या व्यक्तीला दूध-हळद दिलं जातं. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीदेखील दूध-हळद गुणकारी ठरतं. दुधामध्ये हळद उकळून, ते कोमट झाल्यानंतर लहान मुलांना प्यायला (immunity Boosting Drinks) द्यावं. यासाठी कच्ची हळद वापरल्यास आणखी उत्तम; मात्र ती उपलब्ध नसल्यास स्वयंपाकघरातली साधी हळददेखील तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारे घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही आपल्या मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकता.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स