Kidney Health : किडनी मानवी शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक असतात. किडनी यूरीन बनवण्यास मदत करतात. तरतात शरीरातील फ्लूइड आणि मिनरल्स बॅलन्सही करतात. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचंही काम करतात. अशात किडनी खराब होऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं ठरतं. अशात आज आम्ही तुम्हाला किडनी जास्त काळ निरोगी ठेवण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत.
पौष्टिक आहार
कडधान्य, हिरव्या पालेभाज्या आणि फळांचं रोजच्या आहारात समावेश केल्याने किडनींचं आरोग्य चांगलं राहतं. कारण या गोष्टी तुम्ही नॅचरल फॉर्ममध्ये खाता, ज्या किडनीसाठी फार फायदेशीर असतात. तसेच जास्तीत जास्त पाणी पिणं फार गरजेचं आहे.
पुरेशी झोप
जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर तुम्हाला हायपरटेंशन आणि डायबिटीसचा धोका वाढतो. ज्यामुळे किडनीवरही दबाव पडतो. झोपे दरम्यान किडनी जास्त ब्लड फिल्टर करू शकतात आणि जास्त यूरीनही तयार करतात. ज्यामुळे एक्स्ट्रा फ्लूइड आणि वेस्ट शरीरातून बाहेर निघतात. त्यामुळे किडनी निरोगी ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणं महत्वाचं आहे.
पेनकिलर टाळा
वेगवेगळ्या वेदना दूर करण्यासाठी बरेच लोक आपल्याच मनाने पेनकिलरचं सेवन करतात. पण पेनकिलरच्या सेवनाने किडनीचा ब्लड फ्लो प्रभावित होतो. जर आधी कुणाला किडनीसंबंधी किंवा डिहायड्रेशनसारखी एखादी समस्या असेल तर पेनकिलरचं सेवन टाळावं.
मीठ कमी खा
शरीरात मिठाचं बॅलन्स कायम ठेवण्यात किडनींची महत्वाची भूमिका असते. जेव्हा शरीरात एक्स्ट्रा सोडिअम जमा होतं, तेव्हा किडनींना ते बाहेर काढण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे जास्त मिठाचं सेवन करू नये. जास्त मीठ हे हृदयासाठीही घातक असतं.
स्मोकिंग आणि मद्यसेवन
स्मोकिंग केल्याने किडनींचं वेगवेगळं काम प्रभावित होतं आणि किडनीला कॅन्सरचा धोकाही वाढतो. सिगारेटमधील निकोटीनमुळे रक्तवाहिन्यांचंही नुकसान होतं. ज्यामुळे किडनीच्या रक्तवाहिन्याही नष्ट होतात. तसेच जास्त मद्यसेवन केल्याने डिहायड्रेशन आणि हायपरटेंशनची समस्याही होते. ज्यामुळे किडनी प्रभावित होतात. अशात किडन निरोगी ठेवण्यासाठी स्मोकिंग आणि मद्यसेवन टाळलं पाहिजे.