Masala Chaas Recipe: एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा खूप जास्त वाढतो. नंतर मे मध्ये तर विचारायलाच नको. अशात लोक एसी-कूलरच्या माध्यमातून शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण शरीर बाहेरून थंड करण्यापेक्षा आतून थंड करणं जास्त महत्वाचं आहे. जेणेकरून तुम्हाला उष्माघाताचा धोका होणार नाही किंवा डिहायड्रेशनची समस्या होणार नाही. या दिवसात जास्तीत जास्त लोक ताक पितात. कारण याने शरीर थंड राहतं. सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. अशात जर ताकामध्ये मसाला मिक्स केला तर वेगळीच मजा येईल. आज आम्ही तुम्हाला अशीच मसाला ताकाची एक वेगळी रेसिपी सांगणार आहोत.
मसाला छास आइस क्यूब
मसाला ताक पिण्याचा ही पद्धत फारच वेगळी आहे. कारण तुम्हाला यात पुन्हा पुन्हा मेहनत करण्याची गरज नाही. केवळ एकदा तुम्हाला मसाला बनवायचा आहे आणि मग याचा वापर ताक पिताना करायचा आहे. आता आम्ही तुम्हाला या खास रेसिपीबाबत सांगणार आहोत.
मसाला छास बनवण्याची पद्धत
1) सगळ्यात आधी काही आइस क्यूबसोबत कोथिंबीर मिक्सरमध्ये टाका.
2) त्यानंतर त्यात काही पदीन्याची पाने आणि 10 ते 15 कडीपत्त्याची पाने टाका.
3) आता वेगळ्या टेस्टसाठी एक छोटा आल्याचा तुकडा आणि एक हिरवी मिरची टाका.
4) यात तुमच्या चवीनुसार एक चमचा साधं मीठ आणि एक चमचा काळं मीठ टाका.
5) वरून थोडं जिरं टाका आणि थोडी जिऱ्याची पुडही टाका.
6) शेवटी अर्धा कप पाणी टाका आणि मिक्सरमध्ये बारीक करा. पेस्ट तयार झाल्यावर ती आइस क्यूब ट्रे मध्ये टाका आणि फ्रीजमध्ये ठेवा.
अशाप्रकारे तुमच्या मसाला आइस क्यूब तयार आहेत. हे तुम्ही फ्रिजमध्ये स्टोर करू शकता. आता उन्हाळ्यात जेव्हाही तुम्हाला ताक पिण्याची ईच्छा होईल तेव्हा फक्त दोन मसाला आइस क्यूब छासमध्ये टाका. चमच्याने हलवा. हे पिऊन तुम्हाला मजाही येईल आणि शरीराला अनेक फायदेही मिळतील.