Garlic Peel uses : लसणाच्या औषधी गुणांबाबत तुम्हाला चांगलंच माहीत असेल, आरोग्याला याचे अनेक फायदे होतात. लसणाचं सेवन लोक भाजी, रस आणि पेस्टच्या रूपात करतात. यात आढळणाऱ्या पोषक तत्वांमध्ये प्रोटीन 6.3 टक्के, फॅट 0.1 टक्के, कार्बोज 21 टक्के, खनिज पदार्थ 1 टक्के, चूना 0.3 टक्के, लोह 1.3 मिलीग्राम प्रति 100 ग्राम असतं.
त्याशिवाय यात व्हिटॅमिन ए, बी, सी आणि सल्फ्यूरिक अॅसिड असतं. सामान्यपणे लोक लसूण सोलल्यानंतर त्याची साल फेकून देतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, याचे फायदेही अनेक होतात. या सालीपासून सिझनिंग पावडर तयार केलं जाऊ शकतं. आज आम्ही तुम्हाला लसणाच्या सालीपासून फायदेशीर पावडर तयार करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे सांगणार आहोत.
सिझनिंग पावडर कसं तयार करायचं?
1) सगळ्यात आधी तुम्ही लसणाची साल धुवून घ्या, नंतर ती एका ताटात किंवा कपड्यावर उन्हात वाळत घाला. जेव्हा त्या वाळतील तेव्हा ग्राइंडरमधून बारीक करा. तुमचं सिझनिंग पावडर तयार आहे.
2) तुम्ही लसणाच्या सिझनिंग पावडरचा वापर भाज्यांची टेस्ट वाढवण्यासाठीही करू शकता. त्याशिवाय हे पावडर पिठात मिस्क केलं तर याने चपाती आणि पराठ्यांची टेस्टही चांगली होऊ शकते.
3) होममेड गार्लिक पावडर तयार केल्यावर तुम्ही एअर टाइट कंटेनरमध्ये स्टोर करा. याने पावडर खराब होणार नाही. सूर्याची किरणे येतील अशा ठिकाणी ठेवाल तर जास्त फायदा होईल.
कधी खाऊ नये लसूण
उल्टी किंवा लूज मोशन
जर तुम्हाला उलटी आणि लूज मोशनची समस्या असेल तर याचं सेवन अजिबात करू नये. कारण यामुळे पोट गरम होतं. यामुळे जळजळ होण्याची समस्या होऊ शकते. त्यामुळे अशात लसणाचं सेवन टाळलं पाहिजे.
लिव्हर
तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण लसणाच्या जास्त सेवनामुळे लिव्हरला समस्या होऊ शकते. यात अॅंटी-ऑक्सिडेंट तत्व असतात ज्यामुळे लिव्हरमधील विषारी पदार्थ (toxins) जमा होतात. त्यामुळे जास्त लसूण खाणं टाळलं पाहिजे.
हार्ट बर्न
जास्त लसूण सेवनामुळे हार्ट बर्न (heartburn) ची समस्या होऊ शकते. यामुळे छातीत जळजळ होते. त्यामुळे लसूण जास्त खाणं टाळलं पाहिजे.
ब्लड प्रेशर
ज्या लोकांना चक्कर येण्याची समस्या आहे त्यांनी लसणाचं सेवन करू नये. यामुळे त्यांचं ब्लड प्रेशर वाढू शकतं. त्यासोबतच शरीरात रक्त कमी असेल, ब्लड प्रेशर इत्यादी समस्या असतील तर लसूण न खाण्याचा सल्ला दिला जातो.