सध्याच्या काळात बिझी लाइफस्टाईलमुळे आपलं शरीर अनेक आजारांनी वेढलं जातं. याच समस्यांपैकी एक समस्या आहे लिव्हरवर चरबी जमा होणं. फॅटी लिव्हरची (Fatty Liver) समस्या खासकरून त्या लोकांना अधिक होते जे लोक चरबीयुक्त आहार घेतात आणि जास्त प्रमाणात मद्यसेवन करतात. लिव्हरच्या कोशिकांमध्ये सामान्यापेक्षा जास्त फॅट जमा झाल्याने अनेकप्रकारच्या समस्या होऊ शकतात.
फॅटी लिव्हरवर घरगुती उपाय
लिव्हरमध्ये फॅट जमा होण्याच्या स्थितीत गरजेचं आहे की, तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्यात सुधारणा करावी आणि हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करावी. लिव्हरवरील चरबी काही घरगुती उपायांनीही कमी केली जाऊ शकेत. मात्र, हे घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. शरीरात लिव्हरची भूमिका प्यूरिफायरची असते ज्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात.
मिल्क थिस्ल
मिल्क थिस्ल एकप्रकारचं झाड आहे. ज्याला जांभळ्या रंगाचे फूल असतात. याचा वापर औषधं तयार करण्यासाठी केला जातो. मेरीलॅंड मेडिकल सेंटर यूनिव्हर्सिटीनुसार, मिल्क थिस्लने लिव्हर आणि पित्ताशयावर उपचार करण्याचा जुना इतिहास आहे. काही सामान्य परिस्थितींमध्ये मिल्क थिस्लने लिव्हरसोबतच हेपेटायटिस, मूतखळा आणि सिरोसिसवरही उपचार केले जाऊ शकतात. फॅटी लिव्हरच्या उपचारात हे विशेष रूपाने उपयोगी आहे. मिल्क थिस्लमध्ये फ्लेवोनोइड कॉम्प्लेक्स असतं ज्याला सिलेमारिन म्हणतात. याने खरतनाक टॉक्सिन्सपासून लिव्हरचा बचाव होतो.
हळद
तसे तर हळदीमध्ये अनेक गुण असतात जे अनेक प्रकारच्या रोगांमध्ये फायदेशीर असतात. चीनी आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये हळदीचा मोठा वापर केला जातो. हळद लिव्हर, त्वचा आणि पचनतंत्र ठीक करण्यासाठी फायदेशीर असते. हृदयरोगातही हळद फायदेशीर ठरते. हळदीमध्ये अॅंटी-इफ्लेमेटरीसोबत अॅंटी-ऑक्सीडेंट गुण असतात जे लिव्हर डॅमेज होण्यापासून वाचवतात. तुम्ही हळदीचा वापर आहारातून किंवा इतर मार्गानेही करू शकता. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
एक्सरसाइज
यासोबतच तुम्ही नियमितपणे व्यायाम करून लिव्हरवरील फॅट कमी करू शकता. यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम करावा लागेल आणि लाइफस्टाईलमध्ये बदल करावा लागेल. सोबतच हेही लक्षात ठेवा की, अचानक जास्त प्रमाणात व्यायाम करू नका, हलक्या एक्सरसाइजने सुरूवात करा आणि हळूहळू व्यायामाची गती वाढवा. सोबतच वेळोवेळी डॉक्टरांकडून चेकअप करत रहा.
(टिप - वरील लेखातील माहिती किंवा सल्ले हे सामान्य माहितीवर आधारित आहे. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. तुम्हाला काही समस्या असेल तर आधी डॉक्टरांशी संपर्क साधावा. त्यानंतरच योग्य ते उपचार घ्यावेत.)