How To Improve Eyesight : आजकाल कमी वयातही लोकांना जास्त नंबरचा चष्मा लागतो. मोबाइल व लॅपटॉपवर जास्त वेळ घालवणे आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे डोळ्यांच्या दृष्टीवर मोठा वाईट परिणाम होत आहे. डोळे हे शरीरातील सगळ्यात संवेदनशील अवयवांपैकी एक असल्याने त्यांच्याबाबत सगळ्यात आधी डॉक्टरांकडून सल्ला घेतला पाहिजे. तर तुम्हालाही चष्मा लागला असेल आणि तो तुम्हाला दूर करायचा असेल तर आज आम्ही काही गोष्टी सांगणार आहोत.
दृष्टी वाढवण्यासाठी करा 'या' गोष्टी
20 - 20 - 20 चा नियम
डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी 20-20-20 चा फायदेशीर मानला जातो. यात तुम्हाला करायचं हे आहे की, लॅपटॉप किंवा मोबाइलवर काम करताना दर 20 मिनिटांनंतर 20 सेकंदासाठी नजर दुसरीकडे करायची आहे. 20 ते 25 फूटावर असलेली एखादी वस्तू बघायची आहे. ही एक एक्सरसाइज आहे. ज्यामुळे चष्म्याचा नंबर कमी केला जाऊ शकतो.
न्यूट्रिशन
डोळे चांगले ठेवण्यासाठी तुमच्या डाएटमध्ये व्हिटॅमिन सी, ए आणि झिंकसारख्या पोषक तत्वांचा समावेश करा. जसे की, आंबट फळं, हिरव्या पालेभाज्या, अंडी, नट्स आणि बीन्स.
एक्सरसाइज
शरीर निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी वेगवेगळ्या एक्सरसाइज कराव्या लागतात. तसेच डोळे देखील हेल्दी आणि चांगले ठेवण्यासाठी यासंबंधी काही एक्सरसाइज करू शकता. जसे की, डोळे फिरवणे, दूरच्या वस्तूकडे एकटक बघणे, डोळे बंद करून बुबुळं फिरवणं. या एक्सरसाइज रेग्युलर फॉलो केल्या तर चष्म्याचा नंबर बराच कमी केला जाऊ शकतो.
चांगली काळजी
तुम्हाला बराच वेळ मोबाइलमध्ये डोकं घालून बसण्याची सवय असेल तर हे तुमच्या डोळ्यांसाठी सगळ्यात घातक आहे. अशात जर तुम्हाला नजरेचा चष्मा दूर करायचा असेल तर या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे. डोळ्यांना आराम देण्याची खूप गरज आहे. डोळे धूळ-मातीपासून वाचवण्यासाठी नियमितपणे थंड पाण्याचे धुतले पाहिजे.
डोळ्यांसाठी खास उपाय
एक पेन्सिल घ्या आणि तिच्या मधल्या भागावर एखादं अक्षर लिहा किंवा खूण बनवा. आता ही पेन्सिल हाताने डोळ्यांसमोर काही अंतराने धरा. त्यावरील खूणेवर फोकस करा, पेन्सिल हळूहळू नाकाच्या दिशेने आणा आणि फोकस कायम ठेवा. हेच चार ते पाच वेळा करावे.