आजकाल यूरिक अॅसिडची समस्या फारच कॉमन झाली आहे. ज्यामुळे जुने आजार पुन्हा डोकं वर काढतात. खराब लाइफस्टाईल, चुकीचं खाणं-पिणं, पाणी कमी पिणं आणि कॅलरी जास्त असलेल्या पदार्थांचं सेवन यामुळे शरीरात यूरिक अॅसिडचं प्रमाण वाढतं. यूरिक अॅसिड शरीरात जमा होतं. रक्तात जर यूरिक अॅसिडचं प्रमाण वाढलं तर याने सांधेदुखी, किडनीची समस्या, हार्ट अटॅक अशा गंभीर समस्या होऊ शकतात. अनेकदा असंही होतं की, यूरिका अॅसिड क्रिस्टलचं रूप घेतात आणि जॉइंटजवळ जमा होतात. ज्यामुळे जॉइंटमध्ये वेदना होऊ लागतात.
शरीरात यूरिक अॅसिड वाढण्याची कारणं...
- रात्री जास्त खाणं
- खराब लाइफस्टाईल
- पाणी कमी पिणे
- वेळेवर न जेवणे आणि न झोपणे
- जास्त नॉनव्हेज खाणं
- स्ट्रेस
यूरिक अॅसिड वाढल्याने होणाऱ्या समस्या
गाउट - गाउट संधिवाताचं एक रूप आहे. या स्थितीत शरीरात जॉइंटमध्ये वेदना होऊ लागतात. कारण यूरिक अॅसिड जॉइंट आणि टिश्यूजमध्ये तयार होतं. ज्यामुळे सूज आणि वेदना होतात. गाउट सामान्यपणे पायाच्या अंगठ्याचे जॉइंट, टाचा आणि गुडघ्यांना प्रभावित करतं.
किडनीची समस्या - किडनी यूरिक अॅसिड सोबतच रक्तातील अनेक विषारी पदार्थ फिल्टर करतात. यूरिक अॅसिड किडनीला नुकसान पोहोचवतं. यामुळे रक्तात जास्त यूरिक अॅसिड जमा होऊ लागतं.
कशाचं करू नये सेवन?
गोल्डन मनुके - मनुके द्राक्षांपासून तयार होतात. ज्यात प्यूरीन असतं. प्यूरीनच्या सेवनाने गाउट (आर्थारायटीस) ची समस्या आणखी वाढू शकते आणि याने रक्तात यूरिक अॅसिडचं प्रमाण वाढतं. गाउटच्या रूग्णांची ड्राय फ्रुट टाळले पाहिजे.
चिंचेचं पाणी - चिंचेच्या रसाचे अनेक फायदे आहेत. पण गाउटने पीडित लोकांनी याचं सेवन करू नये. फ्रक्टोजचं जास्त सेवन केल्याने यूरिक अॅसिडचं प्रमाण वाढतं. ज्याचे परिणाम चांगले होणार नाहीत.
सफरचंद - सफरचंदामध्येही फ्रक्टोज भरपूर असतं. अशात गाउटच्या स्थितीत सफरचंद अधिक खाणं घातक ठरू शकतं.
खजूर - खजूरामध्ये कमी प्यूरीन असतं. पण यात फ्रक्टोजचं प्रमाण जास्त असतं. अशात खजूर जास्त खाणंही घातक आहे कारण याने रक्तात फ्रक्टोजचं प्रमाण वाढतं.