How To Remove Mucus In Chest : अनेकदा तुम्हाला जावणलं असेल की, सर्दीमुळे नाक बंद झालं किंवा छातीत कफ जमा झालाय. ही समस्या हिवाळ्यात अधिक होते. बऱ्याच लोकांना ही समस्या जाणवते. अशात लोकांना समस्या वाढू नये म्हणून काळजी घेतली पाहिजे.
छातीत जमा कफ कसा बाहेर काढायचा?
जेव्हा अशी समस्या होते तेव्हा नाक आणि छातीत कफ जमा होतो. विंड पाइपमध्ये कफ होणं चांगलंही आहे. कारण तेथील ओलावा टिकून राहतो. पण जेव्हा जास्त कफ तयार होतो तेव्हा सायनस, अॅलर्जी, सर्दी किंवा प्रदूषणाचा प्रभाव होतो. चला जाणून घेऊ कफ कसा दूर करायचा.
1. वाफ घ्या
छातीतील कफ दूर करण्यासाठी तुम्ही सगळ्यातआधी एका भांड्यात पाणी उकडा, या गरम पाण्यात बाम टाका, डोकं टॉवेल झाकून घ्या. या पाण्याची वाफ घेत रहा. असं केल्याने तुम्हाला आराम मिळेल.
2. तेलाचा वापर करा
जेव्हा छातीत कफ जास्त प्रमाणात जमा होतो तेव्हा तुम्हाला श्वास घेण्यास घेण्यास अडचण येऊ लागते. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही नॅच्युरल तेलांचा वापर करू शकता. कारण यातील अॅंटी-इंफ्लेमेटरी आणि अॅंटी-बॅक्टेरिअल ही समस्या दूर करण्यास मदत करतात. तुम्ही रात्री झोपण्याआधी नाकात 2 थेंब इसेंशिअल ऑइल टाका. याने सकाळी नाक साफ होईल.
3. भरपूर पाणी प्या
कफ छातीत जमा झाल्यावर भरपूर पाणी प्यावं. याने शरीर हायड्रेट राहतं. यामुळे कफ कमजोर करण्यास मदत मिळते. या उलट जर शरीरात पाणी कमी असेल तर कफ आणखी घट्ट होतो. ज्यामुळे समस्या जास्त वाढते.
4. वर्कआउट
फिजिकल अॅक्टिविटी कफ मोकळा करण्यास फार फायदेशीर ठरू शकते. याने शरीरात उष्णता येते आणि कफ कमजोर होऊ लागतो. त्यामुळे पायी चालावे, सायकलिंग करा आणि धावणं फायदेशीर ठरतं.