शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
2
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
3
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
4
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
5
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
6
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
8
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
9
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
10
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
12
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
13
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
14
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
15
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
16
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
17
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
18
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

तुमच्या नाभीची योग्य स्वच्छता करा, अन्यथा गंभीर आजार मागे लागतील; जाणून घ्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 3:50 PM

तुम्ही तुमची बेली बटण म्हणजेच नाभी धुतली नाही तर काय होईल? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बेंबी नीट साफ न केल्यामुळं तुम्हाला आरोग्याच्या विविध समस्यांनाही (Health problems) सामोरं जावं लागू शकतं.

अनेकांचा बराच वेळ आंघोळीमध्ये जातो. तर काहीजण फक्त केली म्हणण्यापुरती अंघोळ करतात आणि लगेच बाहेर येतात. अंघोळ करताना बहुतेक लोक चेहऱ्याची, शरीराची त्वचा उजळण्यावर आणि दुर्गंधी दूर करण्यावर भर देतात. परंतु, तुम्ही कधी विचार केलाय का की तुम्ही तुमची बेली बटण म्हणजेच नाभी धुतली नाही तर काय होईल? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बेंबी नीट साफ न केल्यामुळं तुम्हाला आरोग्याच्या विविध समस्यांनाही (Health problems) सामोरं जावं लागू शकतं.

खरंतर, एका डॉक्टरने टिकटॉकवर आपल्या फॉलोअर्ससोबत ही माहिती शेअर केली आहे. बेंबी रोज साफ न केल्यास काय होऊ शकते हे त्यांनी एका व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं आहे. त्यानंतर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर करण राज (Dr. Karan Raj) यांनी टिकटॉक या सोशल मीडिया अ‍ॅपवर एका व्हिडिओद्वारे नाभी साफ करण्याबाबत माहिती शेअर केली आहे. (Belly Button Cleaning Importance and Method)

डॉक्टरांनी काय सांगितले?पेशाने एनएचएस (NHS Surgeon) सर्जन डॉ. राज यांनी सांगितले की, जर आपण नाभी नीट स्वच्छ केली नाही, तर तेथे साचलेली घाण हळूहळू दगडासारखी कठीण होऊ शकते. डॉ. राज यांनी याला 'ग्रिम ज्वेल्स' असं नाव दिलं आहे, ज्याला 'अबोमिनेबल ज्वेल’ (Abominable jewel)देखील म्हटलं जाऊ शकतं. NHS सर्जन डॉ. करण राज दररोज बेली बटण स्वच्छ करण्याची शिफारस करतात.

स्टोन कसा होतोतज्ज्ञ म्हणाले, "घाम, त्वचेच्या मृत पेशी, तेल, कपड्यांचे फॅब्रिक, जंतू इत्यादी आपल्या शरीरावर जमा होऊ शकतात." त्यांनी व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं की, जेव्हा बराच वेळ घाण काढली जात नाही, तेव्हा ती त्या भागावर जमा होऊ लागते आणि साचत जाते. त्याला नाभी स्टोन म्हणून ओळखलं जातं.

त्यांनी पुढे सांगितले की, हे स्टोन अनेक रंगांचे असू शकतात. त्यापैकी सर्वात सामान्य म्हणजे ब्लॅक स्टोन, परंतु काही प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की ते तपकिरी देखील आहेत. त्याला वैद्यकीय परिभाषेत ओम्फॅलोइथ्स म्हणतात. या स्टोनमध्ये सेबम आणि केराटिन दोन्ही असतात. तुमच्या नाभीमध्ये मृत त्वचेसह इतर प्रकारची घाण साचू नये म्हणून सौम्य साबण आणि कोमट पाण्याने स्वच्छ ठेवा. नाभीच्या आतील आणि बाहेरील बाजू ओल्या कपड्याने स्वच्छ करा, नंतर स्वच्छ पाण्याने धुवा आणि रुमालाने थापून वाळवा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स