Mole removal at home : लोक चेहऱ्याचं सौंदर्या कायम ठेवण्यासाठी नको नको ते करतात. अनेक उपाय करून चेहऱ्यावरील डाग, काळपटपणा दूर केलाही जातो. पण काही गोष्टी असा असतात ज्यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्याला ग्रहण लागतं. असाच एक प्रकार आहे चामखीळ. चामखीळीने चेहऱ्याला नुकसान तर होत नाही, पण त्याने सौंदर्याला नक्कीच ग्रहण लागतं. पण ही चामखीळ दूर करण्यासाठी काही घरगुती उपायही आहे. ज्याने तुम्ही चामखीळ नेहमीसाठी गायब करू शकता. चला जाणून घेऊ हे घरगुती उपाय...
लसणाचा वापर
जर तुमच्या चेहऱ्या किंवा मानेवर चामखीळ असेल आणि याने तुमचं सौंदर्य कमी होत असेल तर ही चामखीळ दूर करण्यासाठी तुम्ही लसणाचा वापर करू शकता. त्यासाठी लसूण सोलून कळ्यांचे बारीक बारीक तुकडे करा. हे तुकडे चामखीळ असलेल्या भागावर लावा आणि वरून बॅंडेज बांधा. साधारण 4 ते 5 तास ते तसंच राहू द्या. असं तुम्ही लागोपाठ तीन ते चार दिवस केलं तर चामखीळ पूर्णपणे गायब होईल.
कांदा आणि लसणाचा वापर
चेहऱ्यावरील तीळ किंवा चामखीळ दूर करण्यासाठी लसणाचासोबतच कांद्याचाही वापर करू शकता. यासाठी तुम्ही कांदा आणि लसूण दोन्ही एकत्र करून बारीक करा. त्यातील रस काढा. आता कॉटनच्या मदतीने हा रस चामखीळ असलेल्या भागावर लावा. 20 ते 25 मिनिटांनंतर ते तसंच राहू द्या. काही वेळाने तो भाग पाण्याने धुवून घ्या. काही दिवस हा उपाय केल्यावर तुम्हाला चामखीळ दिसणार नाही.
लसणासोबत अॅप्पल साइडर विनेगर
कांद्याशिवाय तुम्ही लसणाच्या पेस्टमध्ये अॅप्पल साइडर विनेगर मिश्रित करा. लसूण आणि विनेगरची पेस्ट तीळ किंवा चामखीळीवर लावा. अर्धा ते तसंच राहू द्या. काही दिवस हा उपाय करा तीळ आणि चामखीळ दोन्ही गायब होतील.
(टिप : वरील लेखातील टिप्स या सामान्य माहितीवर आधारित आहे. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. तुम्हाला काही समस्या असेल तर तज्ज्ञांना संपर्क करा मगच या टिप्स वापरा.)