Patharchatta For Kidney Stone : आयुर्वेदाच्या खजिन्यात अशा अनेक जडीबुटी आहेत ज्यांचा वापर अनेक गंभीर आजार दूर करण्यासाठी फार पूर्वीपासून केला जातो. आजकाल आजारांवर उपचार करण्यासाठी पाण्यासारखा पैसा लागतो. अशात वनस्पतींचा वापर करून तुम्ही अनेक समस्या दूर करू शकता. अशीच एक वनस्पती म्हणजे पानफुटी.
घराघरांमध्ये सहजपणे दिसणारं हे रोप तुमच्या किडनी स्टोनला लगेच बाहेर काढू शकतं. पानफुटीमध्ये अनेक गुण असतात. यात अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. याने शरीराची सूज आणि वेदना कमी होतात. याची आंबट आणि तुरट पाने आतड्यांसाठीही फायदेशीर असतात.
पानफुटीच्या पानांच्या मदतीने किडनी स्टोन तर बाहेर पडतोच, सोबतच याच्या नियमित सेवनाने शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडतात. ज्यामुळे तुमचा अनेक आजारांपासून बचाव होतो.
किडनी स्टोनसाठी कसा कराल वापर?
एक ग्लास कोमट पाणी घ्या. पानफुटीची दोन ते तीन पाने चावून खावीत. वरून पाणी प्यावे. सकाळी रिकाम्या पोटी हा उपाय करावा. हवं तर तुम्ही या पानांचा रस काढू शशकता. त्यात चिमुटभर काळी मिरे पावडर टाका. याचं नियमित सेवन करा. तसेच या पानांचा तुम्ही काढाही बनवू शकता. यासाठी साधारण अर्धा लीटर पाण्यात पानफुटीची १० ते १२ पाने टाकून उकडून घ्या. जेव्हा पाणी अर्ध होईल तेव्हा याचं सेवन करा. दिवसातून दोनदा या पाण्याचं सेवन करा. यात हवं तर तुम्ही चिमुटभर मीठ टाका.
पानफुटीचे इतर फायदे
वेदना होते दूर
पानफुटी एका पेनकिलरसारखं काम करते. अनेकदा अपचन आणि गॅसमुळे पोटात दुखतं. ही समस्या पानफुटीच्या पानांनी दूर केली जाऊ शकते. यासाठी याच्या पानांच्या रसामध्ये चिमुटभर सुंठ पावडर टाकून सेवन करावं. पोटदुखी लगेच दूर होईल.
हाय ब्लड प्रेशर कंट्रोल होतं
एका रिसर्चनुसार, पानफुटीच्या पानांच्या मदतीने हाय ब्लड प्रेशरही कंट्रोल केलं जाऊ शकतं. यासाठी याची पाने धुवून स्वच्छ करा. नंतर ही पाने बारीक करून त्यांचा रस काढा. एक ग्लास पाण्यात याचा पाच थेंब रसा टाकून सेवन करा. दिवसातून दोनदा हा उपाय कराल तर तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोल होईल.