- मयूर पठाडेज्याला आयुष्यात कधीच दु:खाचा, निराशेचा सामना करावा लागला असा एक तरी जगात आहे का? ब्रहदेवाचीही यातून सुटका झालेली नाही, मग आपण एवढे कोण तिसमारखॉँ लागून गेलो आहोत?टेन्शनच्या नावानं आपण नेहमीच गळे काढत असतो. टेन्शनमुळे मी आजारी पडलो, माझं प्रमोशन हुकलं, माझी प्रगती झाली नाही.. एक ना दोन..जे आपण बोलतो तेच आपण आपल्या मुलांमध्येही पेरत असतो.रोजच्या आयुष्यात आशा-निराशेचे प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात. प्रत्येकालाच त्याचा सामना करावा लागतो, पण त्याच्याशी दोन हात करताना आपली भूमिका काय असते तेही महत्त्वाचं असतं.आजकाल तर लहान मुलांमध्येही आपल्या टेन्शन्स दिसतात. ते साहजिकही आहे, पण त्या त्या प्रसंगांत आपण त्यांच्याशी कसं वागतो, यालाही खूपच महत्त्व आहे.खरं तर सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. आपल्या भावनांवर नियंत्रण राखायला आपण शिकलं पाहिजे. ते आपल्याला जमलं तर आपोआपच मुलांमध्येही त्याची रुजवात होते.तरीही या काही गोष्टी..मुलांची पिअर प्रेशर्स सांभाळताना, त्यांना त्यातून बाहेर काढताना काही गोष्टींची काळजी पालक म्हणून आपणच घेतली पाहिजे. नाहीतर जे आपल्याबाबत झालं, तेच त्यांच्याबाबतही होईल. मुलांना त्यांच्या रोजच्या आयुष्यातील पिअर प्रेशर्सबाबत प्रशिक्षित करताना पालक म्हणून तुम्ह्ी काय कराल?१- मुलं आणि आपल्याबंधले बंध कायमच बळकट राहातील याकडे लक्ष द्या.२- मुलं जेव्हा कोणतंही टेन्शन, आपला प्रश्न घेऊन तुमच्याकडे येतात, तेव्हा प्रश्न कितीही छोटा असो, त्यांचं ऐकून घ्या. हाडतूड करून त्यांना परत पाठवू नका.३- आपल्या मुलांनी कितीही चुकीचं काम केलं असेल तरी लगेच विचित्र पद्धतीनं रिअॅक्ट होऊ नका. हे जमणं तसं अवघड आहे, पण करून पाहा. शांतपणे त्याला समजावून सांगा. काही वेळा प्रयत्न करा, नक्कीच, तुम्हाला आणि त्यालाही जमायला लागेल.४- आपल्या स्वप्रतिमेचीही काळजी घ्या. आपण राक्षस, सैतान, संतापी आहोत अशी प्रतिमा मुलांच्या मनात तयार होऊ देऊ नका.५- मुलांना चांगले निर्णय घेता येतील यासाठी त्यांना तयार करा, प्रोत्साहन द्या.६- आपल्या मुलांचे मित्र कोण आहेत, त्याची संगत चांगल्या मुलांशी आहे की नाही, एकत्र असताना ते काय करतात, याकडेही वरचेवर लक्ष असू द्या, मुलांशी बोलत चला..
तुम्हीच ‘जमदग्नी’ असाल, तर मुलांनी कसं शिकावं प्रेशर हॅँडलिंग?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 5:46 PM
मुलांना तणावावर नियंत्रण ठेवायला शिकवायचं असेल पालकांना कराव्या लागतील या गोष्टी..
ठळक मुद्देमुलं आणि आपल्याबंधले बंध कायम बळकट ठेवा.मुलांचं ऐकून घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना मदत करा.आपल्या स्वप्रतिमेची काळजी घ्या.मुलांच्या संगतीकडे लक्ष द्या.