(Image credit : Polokwane Review)
ह्यूमन पेपिलोमा व्हायरस म्हणजेच, एचपीवी अत्यंत घातक व्हायरस आहे. हा व्हायरस अत्यंत वेगाने शरीरात पोहोचतो आणि त्यानंतर शरीरामध्ये काही विशेष लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे या व्हायरसची लागण झाल्याचं ओळखणं अत्यंत कठिण असतं. या व्हायरसचा संसर्ग शारीरिक संबंधातून होतो. शारीरिक संबंध ठेवणाऱ्या कमीत कमी 80 टक्के महिला आणि पुरूषांना आपल्या जीवनामध्ये या व्हायरसचा सामना करावा लागतो. त्यामुळे ह्यूमन व्हायरसची लागण झाल्यास त्यापासून कसा बचाव करावा याबाबत जाणून घेणं अत्यंत गरजेचं असतं. ह्यूमन पेपिलोमा व्हायरस सेक्स आणि ओरल सेक्समार्फत एकमेकांमध्ये पसरतो. याव्यतिरिक्त शारीरिक संबंध ठेवताना जर कंडोमचा वापर केला नाही तरिदेखील या व्हायरसची लागण होऊ शकते.
असा करा बचाव :
1. ह्यूमन पेपिलोमा व्हायरसच्या संसर्गाने पीडित असाल तर, यावर कोणताही ठोस उपाय नाही. परंतु, या व्हायरसच्या लक्षणांबाबत माहिती झाल्यानंतर मात्र यावर नियंत्रण मिळवता येते. एचपीवीपासून बचाव करण्यासाठी एकापेक्षा जास्त लोकांशी शारीरिक संबंध ठेवू नका. असं केल्याने या व्हायरसचा संसर्ग होण्यापासून बचाव करणं सोपं होतं.
2. एचपीवी संसर्ग झाल्यानंतर महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचीही शक्यता वाढते. जर गर्भाशयामध्ये काही असामान्य पेशींची निर्मिती होत असेल तर त्यावर उपचार करणं शक्य होतं. तसेच एक्सपर्ट्सनी सांगितल्यानुसार, महिलांनी वेळोवेळी तज्ज्ञांच्या सल्ल्याने काही तपासण्या करणं गरजेचं असतं. एका अहवालातून स्पष्ट झाल्यानुसार, महिलांमध्ये दिसून येणारे गर्भाशयाच्या कॅन्सरची अधिकाधिक प्रकरणं एचपीवीच्या कारणाने होतात.
3. एचपीवीच्या व्हायरसचं संक्रमण फारसं नुकसान पोहोचवत नाही आणि कालांतराने या व्हायरसचा प्रभाव नष्ट होतो. तसेच जर गुप्तांगामध्ये गाठी झाल्या तर त्यावर औषधोपचार करून ते ठिक करणं शक्य असतं.
4. एचपीवी संसर्गामुळे शरीरामध्ये इतर कॅन्सर होण्याचादेखील धोका वाढतो. यामध्ये गळ्याचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर आणि पुरूषांच्या गुप्तांगाच्या कॅन्सरचा समावेश असतो. अनेक प्रकरणांमधून असं दिसून आलं आहे की, या व्हायरचा संसंर्ग झाल्याच्या लक्षणांबाबत वेळीच समजलं नाही तर कॅन्सर होऊ शकतो. तरूणांसाठी या व्हायरसपासून बचाव करून घेण्यासाठी लस उपलब्ध आहे.
या व्यक्तींना असू शकतो एचपीवीचा अधिक धोका :
- ज्या व्यक्ती अधिक मद्यसेवन करतात.
- वाढत्या वयाच्या पुरूषांना जास्त असतो धोका.
- एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्यांमध्ये व्हायरस पसरतो.
- ज्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते त्यांच्यामध्येही व्हायरसचा धोका अधिक असतो.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणत्याही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.