दारु पिण्यास पैसे न दिल्याने पतीने घेतले विष
By admin | Published: July 04, 2016 12:46 AM
जळगाव : दारु पिण्यास पत्नीने पैसे न दिल्याने रवी सुकदेव सोनवणे (३०, रा. कोंबडी बाजार परिसर) यांनी विष प्राशन केल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली.
जळगाव : दारु पिण्यास पत्नीने पैसे न दिल्याने रवी सुकदेव सोनवणे (३०, रा. कोंबडी बाजार परिसर) यांनी विष प्राशन केल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. रवीची पत्नी स्वत: काम करुन संसाराचा गाडा चालविते. रविवारी रवीने पत्नीकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले मात्र तिने देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर रवीने विषप्राशन केले व घरी आले. त्यावेळी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.