शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
4
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
7
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
9
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
10
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
11
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
12
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
13
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
14
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
15
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
16
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
17
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
18
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
19
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

COVAXIN लस अधिक प्रभावी बनवण्यासाठी 'या' औषधाचा वापर करणार भारत बायोटेक 

By ravalnath.patil | Published: October 06, 2020 9:10 AM

COVAXIN : भारत बायोटेक कंपनीने कोरोनावरील Covaxin लस तयार केली असून सध्या या लसीची चाचणी सुरु आहे. 

हैदराबाद : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील फार्मा कंपन्या लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. देशातील भारत बायोटेक कंपनीने सुद्धा कोरोनावरील Covaxin लस तयार केली असून सध्या या लसीची चाचणी सुरु आहे. 

या Covaxin मध्ये आणखी एक औषध मिश्रित केले जाणार आहे, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती आणखी मजबूत होईल, असे भारत बायोटेक कंपनीने म्हटले आहे. यासाठी Covaxinमध्ये Alhydroxiquim-II अॅड करणार आहे. या लसीमध्ये Alhydroxiquim-II एक सहायक म्हणून काम करेल आणि रोग प्रतिकारशक्ती आणखी वाढवेल, असे कंपनीने म्हटले आहे.

हैदराबादस्थित फार्मा कंपनी भारत बायोटेकने कोरोनावरीव लस लाँच करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीला लस तयार करण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून परवानगी मिळाली आहे, ही कंपनी सध्या Covaxin ची मानवी चाचणी दुसऱ्या टप्प्यात सुरु आहे.अमेरिकेतील कॅनससमधील लस निर्माती कंपनी वायरोव्हॅक्स एलएलसी ही  Alhydroxiquim-II तयार करते. या कंपनीबरोबर करार झाल्यानंतर भारत बायोटेक कंपनी हे औषध वापरणार आहे.

भारत बायोटेकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कृष्ण इला यांनी सांगितले की, अशा सहाय्यक तत्त्वांची गरज असते की जे लस अँटिजनच्या प्रति अधिक अँटिबॉडी रिस्पॉन्स देतील. त्यामुळे रोगजनकांपासून दीर्घकालीन संरक्षण उपलब्ध होईल. याशिवाय, वायरोव्हॅक्सशी आमची भागीदारी भारत बायोटेकसाठी सुरक्षित आणि प्रभावी लस विकसित करण्याच्या आमच्या समर्पणाचा परिणाम आहे, जेणेकरून दीर्घावधीपर्यंत रोग प्रतिकारशक्ती मिळू शकेल, असेही कृष्ण इला यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या