काही लोकांच्या शरीरावर खूप केस असतात तर काहींच्या नाही. प्राण्यांच्या शरीरावर अधिक केस असतात. इतके केस एखाद्या माणसाच्या शरीरावर असू शकतील अशी आपण कल्पना ही करु शकत नाही. मात्र असेही लोक आहेत ज्यांच्या चेहऱ्यावर प्राण्यांसारखे केस येतात. ते बघुन एखाद्याला भिती वाटेल. हे एक सिंड्रोम असून भारतात एक मुलगा आहे ज्याला या सिंड्रोमचा सामना करावा लागत आहे.
मध्य प्रदेशातील नंदलेटा या छोट्या गावात राहणारा ललित पाटीदार १७ वर्षीय मुलगा या सिंड्रोममुळे पिडीत आहे. त्याच्या चेहऱ्यावर अधिकचे केस आहेत.पाटीदार कुटुंबीय मध्यमवर्गीय असून ललित १२ वीत आहे. तो शेतात वडिलांची मदक करतो. घरची परिस्थिती जेमतेमच आहे. तर ललितला जन्मत:च Hypertrichosis हायपरट्रिकोसिस म्हणजेच Werewolf syndrome वेयरवोल्फ सिंड्रोम ने ग्रासलेले आहे. त्याच्या चेहऱ्यावर, शरीराच्या इतर भागावर जास्त प्रमाणात केस आहेत.
ललित म्हणतो, 'लहान मुलं मला बघुन घाबरतात. मी एखाद्या प्राण्यासारखा दिसतो म्हणून ते दूर पळतात. माझ्या आईवडिलांनी सांगितले, माझ्या जन्मानंतर डॉक्टरांनी शेव केले. सहा वर्षाचा असेपर्यंत याकडे कोणी लक्ष नाही दिले. काही काळानंतर मला लक्षात आले ची केस खूप वाढत आहेत. लोक मला माकड म्हणून चिडवायचे. माझ्यावर दगडही मारुन फेकायचे. लाखो लोकांमध्ये मी वेगळा होतो कारण माझ्या पूर्ण शरीरावर केस आहेत. मला सुद्धा सामान्य लोकांसारखे जगायचे आहे.'
शरीरावर असामान्य पद्धतीने केस वाढणे याला Hypertrichosis हायपरट्रिचोसिस म्हणतात. हा फारच दुर्मिळ सिंड्रोम असून महिला व पुरुष दोघांनाही होऊ शकतो. यामध्ये संपू्र्ण शरीरावर केस येतात किंवा काही ठराविक भागांवर केस येतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हा सिंड्रोम का होतो याचे कारण समजू शकलेले नाही.हा सिंड्रोम आनुवंशिकही असू शकतो. कुपोषण, डाएट, इटिंग डिसऑर्डर, नर्वोसा, कॅन्सर, स्टेरॉइड, औषधांचे साईड इफेक्ट यामुळे हायपरट्रिचोसिस होण्याची शक्यता असते.