(Image Credit : Daily Star)
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये निरोगी आयुष्य जगण्यासाठी आणि फिट अॅन्ड फाइन राहण्यासाठी आपल्या फिटनेसकडे लक्ष देणं आवश्यक असतं. अनेक लोकांना या गोष्टी पटत असून ते सध्या आपल्या फिटनेसकडे लक्ष देऊ लागले आहेत. अशातच यामध्ये सर्वात मोठा अडथळा असतो तो म्हणजे, शरीरातील काही अवयवांवर जमा झालेली चरबी. खासकरून महिला पोटावर आणि लोअर बॅकवर जमा झालेल्या चरबीमुळे हैराण असतात. ही चरबी कितीही व्यायाम केला तरी कमी होत नाही. जर तुम्हीही या समस्येचा सामना करत असाल तर, तुम्ही या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी आइस थेअरपीचा वापर करू शकता.
(Image Credit : Ayşe Tolga)
काय आहे आइस थेरपी?
उन्हाळ्यामध्ये बर्फाचा अनेक पद्धतींनी वापर करण्यात येत आहे. खाण्या-पिण्याच्या गोष्टींसोबतच अनेकदा मसाज करण्यासाठीही बर्फ म्हणजेच आइस वापरण्यात येतो. अशाच प्रकारे शरीरातील काही खास अवयवांवरील फॅट बर्न करण्यासाठी बर्फाचा वापर करण्यात येतो. याच पद्धतीलाच आइस थेरपी असं म्हटलं जातं.
बॉडी टोनअप करण्यासाठीही आइस थेरपी फायदेशीर...
अनेक रिसर्चमधून सिद्ध झाल्यानुसार, शरीराच्या काही अवयवांवर बर्फ लावल्याने फट बर्न करण्यासाठी मदत मिळते. शरीराच्या ज्या अवयवांवर जास्त प्रमाणात चरबी जमा झाली असेल. त्यांना स्लिम आणि फिट करण्यासाठी आइस थेरपी मदत करते. आइस थेरपी टिश्यू टाइट करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्सिफाय करण्यासाठी मदत करते. ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते.
असा करा उपयोग...
आइस थेरपीचा उपयोग करण्यासाठी तुम्ही आइस बॅग्स, जेल पॅक्स आणि इतर पद्धतींनी फॅट बर्न करू शकता. जर तुम्ही घरच्या घरी या थेरपीचा फायदा घेण्याचा विचार करत असाल तर, तुम्ही एका झिप लॉक बॅगमध्ये काही बर्फाचे तुकडे घ्या आणि ज्या ठिकाणी जास्त चरबी जमा झालेली आहे, त्या ठिकाणी लावा. जर तुमच्याकडे झिप लॉक बॅग नसेल, तर तुम्ही बर्फाचे तुकडे कपड्यामध्ये गुंडाळूनही वापरू शकता. जर तुम्ही ही या थेरपीला आणखी प्रभावी करण्याच्या विचारात असाल तर बर्फाचा वापर करण्याआधी तुम्ही त्वचा मातीच्या मदतीने स्वच्छ करून घ्या. यामुळे शरीरातील रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो. त्यानंतर तुम्ही बर्फाचा वापर करू शकता.
(Image Credit : Focus)
या गोष्टी लक्षात ठेवा
तुम्ही घरच्या घरीच बर्फ तयार करून त्याचा वपर करू शकता. परंतु, बाजारात पाण्याच्या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे ऑइल्स, हर्ब यांपासून तयार करण्यात आलेला बर्फ मिळतो. ज्यांचा वापर केल्याने वजन कमी करण्याची प्रक्रिया फार वेगाने होते. तुम्ही यांचाही वापर करू शकता. घरी या थेरपीचा वापर करताना लक्षात घ्या की, तुम्ही कधीच थेट त्वचेवर बर्फाचा वापर करू नका. बर्फ वापरताना एखाद्या झिप लॉक बॅगमध्ये किंवा कपड्यामध्ये गुंडाळून त्यांचा वापर करा.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं.