देशभरात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या केसेस वाढत आहेत. पण रुग्णांची बरी होण्याची संख्या सुद्धा वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेट जास्त आहे. त्यामुळे डॉक्टरांनी औषधाच्या कॉबिम्बिनेशन तयार करून रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली आहे. आता अजून एका औषधाला कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी मान्यता देण्यात आली आहे.
इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMR ने दिलेल्या माहितीनुसार आधी हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीननंतर इबोलाच्या आजारात वापरात असलेली औषधं त्यानंतर रेमडेसिविरला मान्यता देण्यात आली आहे. आयसीएमआरने आता नवीन औषधांना ट्रायलसाठी परवागनी दिली आहे. या औषधाचे नाव पेरामिविर (Peramivir) आहे. बाजारात रॅपीवॅब (Rapivab) नावाने ओळखलं जातं. या औषधाला अमेरिकी फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (FDA) ने मान्यता दिली आहे. या औषधाचा वापर स्वाईन फ्लू आणि यांसारख्या आजारांना रोखण्यासाठी केला जात होता.
या एंटीव्हायरल औषधाचा वापर इमरजेंसी स्थितीत केला जात होता. ते ही डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली, हे औषध अमेरिकेतील बयाोक्रिस्ट फार्मस्यूटिकल्स कंपनी तयार करते. या औषधावरिल ट्रायल २००८ मध्ये सुरू करण्यात आलं होतं. आंतराराष्ट्रीय पातळीवर २०१४ मध्ये या औषधाला मान्यता देण्यात आली. हे एक परिणामकारक एंटीव्हायरल औषध आहे.
या औषधाचा वापर जास्तीत जास्त एच1एन1 इंफ्लूएंजा (H1N1) म्हणजेच स्वाइन फ्लू (Swine Flu) साठी केला जात होता. या औषधाला जपान आणि दक्षिण कोरियाने मान्यता दिली आहे. त्या ठिकाणी या औषधाला पेरामिफ्लू या नावाने ओळखलं जातं. या औषधाचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत.
घरात राहूनही 'असा' होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग; हे उपाय वापरा आणि संसर्गापासून लांब राहा
CoronaVirus: पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी इफेक्टिव्ह ठरतील 'हे' घरगुती उपाय