शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

तुम्ही वापरत असलेल्या जिऱ्यात झाडूचा भुसा तर नाही? कशी ओळखाल भेसळ? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 11:33 AM

आपल्या स्वयंपाकघरात वापरलं जाणारं जीरं हे देखील काहीवेळा भेसळयुक्त असु शकतं. यासाठी बाजारातून जीरं विकत घेताना तुम्हाला खबरदारी घ्यावी लागेल.

सध्या आपण अशा वातावरणात जगत आहोत जिथे अनेकदा खाद्यपदार्थात आपल्याला भेसळ पाहायला मिळते. त्यामुळे शरीराला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आपल्या स्वयंपाकघरात वापरलं जाणारं जीरं हे देखील काहीवेळा भेसळयुक्त असु शकतं. यासाठी बाजारातून जीरं विकत घेताना तुम्हाला खबरदारी घ्यावी लागेल.

जीरं हा केवळ स्वयंपाकघरात वापरला जाणारा मसाला नव्हे तर जिऱ्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहे. वजन कमी करण्यात जिऱ्याचा उपयोग होतो. सकाळी काहीही खाण्यापुर्वी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने वजन झटपट कमी होते. नुकतंच दिल्ली पोलीसांनी भेसळयुक्त जिऱ्याचा माल जप्त केला. भेसळयुक्त जिरं बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये मारण्यात आलेल्या छाप्यात २० हजार किलोचा नकली माल आणि ८ हजार किलोचा कच्चा माल जप्त केला आहे. यामागे युपीमधील शहांजपूर येथील जलालबादमध्ये राहणारी व्यक्ती मास्टरमाईंड असल्याचे उघडकीस आले आहे.

कसं बनतं भेसळयुक्त जिरं?

  • भेसळयुक्त जिरं बनवण्यासाठी झाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट गवताचा वापर केला जातो.
  • त्याशिवाय यात लहान खडे मिसळले जातात.
  • सोबतच यात गुळाचा पाकही वापरला जातो.

तुमच्या माहितीसाठी, झाडू बनवण्यासाठी जे जंगली गवत वापरलं जायचं ते उत्तरप्रदेशमध्ये पाच रुपये प्रति किलोने मिळतं. ही नदीच्या किनारी उगवते. या गवताला जी छोटी पान असतात ती जिऱ्यासारखीचं दिसतात.

भेसळयुक्त जिरं बनवण्याची प्रक्रिया काय?भेसळयुक्त जिरं बनवण्यासाठी या विशिष्ट गवताच्या पानांना गुळाच्या पाकात भिजवलं जायचं. त्यामुळे याचा रंग अस्सल जिऱ्यासारखा दिसायचा. त्यानंतर या पानांना दगडापासून बनवल्या जाणाऱ्या पावडरमध्ये मिसळं जातं असे. त्यानंतर या मिश्रणाला लोखंडाच्या मोठ्या चाळणीने चाळलं जायचं अन् यात स्लरी पावडर(एका प्रकारची अ‍ॅसिडिक पावडर) मिसळली जायची जेणेकरुन या भेसळयुक्त जिऱ्याचा रंग अस्सल जिऱ्यासारखा दिसावा.

२० रुपयात मिळायचं भेसळयुक्त जिरंबाजारात अस्सल जिऱ्याचा भाव ३०० रुपये प्रति किलो आहे मात्र हे भेसळयुक्त जिरं फक्त २० रुपये प्रति किलोला विकत मिळतं.

आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे भेसळयुक्त जिरं

  • भेसळयुक्त जिऱ्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकवूत होते.
  • तसेच यामुळे तुम्हाला त्वचा आणि किडनी स्टोनचाही त्रास उद्भवू शकतो.

कसं ओळखाल भेसळयुक्त जिरं?भेसळयुक्त जिरं ओळखणं कठीण नाही. त्यासाठी तुम्हाला एक वाटी पाणी घ्याव लागेल अन् त्यात जिरं मिसळावं लागेल. जर जिऱ्याचे दाणे तुटले व त्याचा रंग निघाला तर समजून जा की हे जिरं भेसळयुक्त आहे. अस्सल जिरं पाण्यात आपला रंग बदलत नाही ना तुटतं. तसंच वासावरुनही तुम्हाला अस्सल आणि भेसळयुक्त जिऱ्यामधील फरक कळु शकतो.  अस्सल जिऱ्याला वास असतो तर भेसळयुक्त जिऱ्याला वास नसतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स