नवी दिल्ली – कोरोनाच्या मुख्य लक्षणांमध्ये ताप, खोकला, थकवा आणि गंध न येणे याचा समावेश आहे. त्वचेमध्येही कोविड १९ ची लक्षणं दिसून येतात. शरीरातील आणखी एक भाग आहे ज्याठिकाणी कोविड १९ ची लक्षणं दिसून येतात. ते आहेत तुमची नखं. कोविड १९ च्या संक्रमणानंतर काही रुग्णांच्या नखांचा रंग फिकट झाल्याचं दिसून आलं आहे. त्याचसोबत आठवड्यांनंतर नखांचा आकारही बदलला जात असल्याचं आढळतं.
वासिलियोस वासिलीऊ, यूनिवर्सिटी ऑफ ईस्ट एंग्लिया, निखील अग्रवाल, सुबोधिनी सारा सेलवेंद्र यांनी केलेल्या रिपोर्टमधून हे समोर आलं आहे. अनेक रुग्णांच्या नखांमध्ये बदल झाल्याचं दिसून आलं. एक लक्षण म्हणजे नखांवर लाल रंगाची चंद्रकोर आकृती बनते. कोविडशी निगडीत नखाच्या अन्य लक्षणांमध्ये पहिलंही दिसून येत होतं. कोविड संक्रमणानंतर २ आठवड्यांच्या कालावधीत रुग्णांमध्ये दिसून आलं. परंतु याचे खूप कमी प्रमाण आहे.
सुरुवातीला नखांचे निरीक्षण फार कमी करण्यात आले. नखांवर लाल रंगाची चंद्रकोर आकृती दिसणे दुर्लभ आहे. त्यामुळे याला कोविड १९ च्या संक्रमणाचे संकेत म्हणून पाहता येऊ शकते. कोरोना संक्रमणामुळे रुग्णाच्या शरीरातील रक्तावर परिणाम होत असल्याने ही आकृती दिसत असावी. अथवा व्हायरसविरोधात प्रतिकार करण्यामुळे असं होण्याची शक्यता आहे. ज्यात रक्ताचे छोटे टिपके जमतात आणि नखावरील रंग फिकट होऊ लागतो. रुग्ण जर लक्षणमुक्त असेल तर त्याने या आकृतीबद्दल चिंता करण्याचे कारण नाही. ते किती काळ राहतात हे निश्चित नाही. हे चिन्ह एक ते चार आठवड्यांपर्यंत राहत असल्याचं रिपोर्टमध्ये सांगितलं आहे.
काही रुग्णांच्या हाता-पायांवरील बोटांच्या नखांवर विविध रेषा दिसून येतात जे कोविड संक्रमणाच्या ४ ते त्यापेक्षा अधिक आठवड्यापर्यंत दिसतात. सामान्यत: या रेषा तेव्हाच दिसतात जेव्हा कोणत्याही प्रकारचं शारिरीक तणाव, संक्रमण, कुपोषण अथवा किमोथेरेपीमुळे नखांच्या वाढीवर परिणाण होतो. आता कदाचित कोविड १९ हेदेखील कारण असल्याचं नाकारता येत नाही.
नखं दरमहिन्याला सरासरी २ मिमी ते ५ मिमी पर्यंत वाढतात. शारिरीक तणाव असल्यावर चार-पाच आठवड्यानंतर या रेषा स्पष्टपणे दिसून येतात. जसजसं नखं वाढतात ते ठळकपणे दिसून येते. या रेषांवर कोणताही विशेष उपचार नाही कारण समस्येचे निराकारण झाल्यानंतर त्या ठीक होतात. सध्या कोविड १९ चं गांभीर्य आणि नखांमध्ये होणारे बदल यात काही संबंध नाही. कोविड संक्रमणानंतर नखांमध्ये दोन सामान्य बदल दिसतात. परंतु संशोधकांनी अन्य असामान्य घटनांचाही उल्लेख केला आहे. एका रुग्णांमध्ये जाणवलं की, संक्रमित झाल्यानंतर ११२ दिवसांत त्याच्या नखांवर केशरी रंगाचे चिन्ह दिसते. त्यावर कोणताही उपाय नाही. एक महिन्यानंतर ते चिन्ह कमी झाले नाही. यामागे कारण अज्ञात आहे.
नखांवर सफेद रेषा
तिसऱ्या प्रकरणात एका रुग्णांच्या नखांवर पांढऱ्या रंगाच्या रेषा दिसल्या. कोविड १९ चं संक्रमण झाल्यानंतर ४५ दिवसांत असं चिन्हं दिसून येत आहे. नखं वाढल्यानंतर ते ठीक होतं. त्याला उपचाराची आवश्यकता नाही. परंतु तिन्ही स्थितीत नखांमध्ये होणारे बदल कोविड संक्रमणाशी जोडलेले दिसतात. परंतु सध्या खूप कमी रुग्णांमध्ये हा बदल दिसून येतो. त्यामुळे हे बदल आजाराचं कारण आहेत असं पूर्णपणे सांगता येत नाही.