आपण एखादा आवडीचा आणि चवीचा पदार्थ असला की पोट भरले तरी खातो. याचा परिणाम आपल्या पोटावर होतो व पोट दुखु लागते. आयुर्वेदात याचे उत्तर आहे. आयुर्वेदात अशा पाच वनस्पती सांगण्यात आल्या आहेत ज्या खाल्ल्यावर पोटदुखीवर चटकन आराम मिळतो. डॉ. मनीष सिंह यांनी ही माहिती ओन्लीमाय हेल्थ या संकेतस्थळाला दिली. त्यांनी असेही म्हटले आहे की या वनस्पतींची तुम्ही पेस्ट करून, काढा बनवून अथवा चहासोबत पिऊ शकता. बघुया अशा कोणत्या वनस्पती आहेत ज्यामुळे तुमची पोटदुखी लगेच थांबते.
तुळस विविध आजारांमध्ये तुळस उपयुक्त औषधीप्रमाणे काम करते. दररोज तुळशीचे पाच पानं खाल्ल्यास पोटातील गॅसची समस्या तसेच इतर पोटाचे आजार ठीक होतात. गॅस समस्येमध्ये तुळशीचा चहा करून प्यायल्यास आराम मिळेल.
पुदिना ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, पाचक आहे. पोटदुखीवर उपयोगी आहे. पुदिना खाल्ल्याने पोट साफ व लघवी साफ होते.
लेमन ग्रासलेमन ग्रासचा तुम्ही चहा बनवून पिऊ शकता. त्यामुळे अपचनाच्या समस्येवर आराम मिळतो. अल्सरवर लेमनग्रास रामबाण उपाय आहे. लेमनग्रासमुळे रात्रीची शांत झोप येते.
लेमन वर्बेनालेमन वर्बेना अँटीऑक्सिडंट्सनी युक्त आहे. जर तुम्हाला अतिखाण्यामुळे पोटदुखीची संमस्या जाणवत असेल तर ही वनस्पती त्यावर उत्तम उपाय करेल. तुम्ही कोमट पाण्यात याची पानं टाकून पिऊ शकता.
कॅमोमाईलकॅमोमाईल हे पोटदुखीवरील समस्या लवकरात लवकर दुर करते. पोटदुखीवर तुम्ही कॅमोमाईलच्या पानांचा चहा बनवून पिऊ शकता किंवा पाण्यात उकळुन लिंबू आणि मधासोबत घेऊ शकता.