(Image Credit : monthlygift.com)
मासिक पाळीदरम्यान जास्तीत जास्त महिला या पीरियड क्रेम्स किंवा मूड स्वींगच्या शिकार होत असतात. त्यामुळे चहा आणि कॉफीसहीत त्या अनेकदा धुम्रपान सुद्धा करतात. पण मासिक पाळीमध्ये असं करण चुकीचं आहे. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मासिक पाळीदरम्यान प्रत्येक महिलेला वेगवेगळ्या परिवर्तनांचा सामना करावा लागतो. यावेळी पोटात असह्य वेदना होतात.
ही चूक करतात
असह्य वेदनांमुळे काही महिलांना मूडस्वींग आणि तणाव यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. यापासून बचाव करण्यासाठी काही महिला चहा-कॉफीचं अत्याधिक सेवन करणे सुरू करतात. तर काही महिला धुम्रपान आणि अल्कोहोलचं देखील सेवन करतात. पण ही स्थिती फार नाजूक आणि संवेदनशील असल्याने तज्ज्ञ असं न करण्याचा सल्ला देतात.
निकोटीनची सवय चुकीची
एका ताज्या रिसर्चनुसार, मासिक पाळीदरम्यान ज्या महिला धुम्रपानाची तलब कंट्रोलमध्ये ठेवू शकतात, त्यांना इतर दिवशी धुम्रपान सोडणे सोपं असतं. कारण मासिक पाळीदरम्यान निकोटीन शरीराची निकोटीनची गरज वाढत असते. कॅनडाच्या मॉन्ट्रियल विश्वविद्यालयातील एड्रीयाना मेंड्रेक यांच्यानुसार, 'आमच्या रिसर्चमधून समोर आलेली आकडेवारी पाहून हे लक्षात आलं की, मासिक पाळीच्या सुरूवातीच्या दिवसात महिलांची धुम्रपानाची तलब नियंत्रणाबाहेर जाते'.
मेंड्रेक यांनी सांगितले की, 'महिलांची धुम्रपानाची सवय सोडवण्यासाठी मासिक पाळीची माहिती फायदेशीर ठरू शकते. मासिक पाळीच्या दुसऱ्या टप्प्यात ओवुलेशननंतर महिलांना धुम्रपानाची सवय कंट्रोल करण्यासाठी सोपं होतं. कारण या टप्प्यात ओस्ट्रोजन आणि प्रोजेस्टोरोन हार्मोन्सचं प्रमाण वाढतं'.
हे उपाय करू शकतात
शरीराला गरमी द्या - असह्य वेदना कमी करण्यासाठी गरम पाण्याचा वापर केला पाहिजे. याने वेदना कमी होण्यासोबतच मासिक पाळीत वाहणाऱ्या रक्ताला कोणत्याही अडथळ्याशिवाय बाहेर येण्यास मदत होईल. तसेच गरम पाण्याने आंघोळ केल्याने किंवा पोट गरम पाण्याने शेकल्याने आराम मिळेल.
नैसर्गिक उपचाराने आराम मिळेल - अनेक महिला यादरम्यान होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी असे काही उपाय करू शकतात ज्यांचे काही साइड इफेक्ट नसतील. वेदना होत असताना ओव्याचा काढा, तुळशीचा काढा आणि आल्याचं सेवन करावं. याने तुम्हाला आराम मिळेल.